Gandhi Jayanti 2021 : 'माझं जीवन हाच माझा संदेश आहे' असं सांगणाऱ्या महात्मा गांधीजींचे जीवन खरंच एक मोठा संदेश आहे. गांधी शरीराने संपले असले तरी त्यांचे विचार आजही त्यांना जिवंत ठेवतात. देशात आज महात्मा गांधींची 152 वी जयंती साजरी केली जात आहे. 


जगातला असा एकही व्यक्ती नसेल ज्याच्या जीवनाला गांधीवादाने कधीच स्पर्श केला नसेल. महात्मा गांधीनी आपल्या विचारातून आणि कृतीतून आयुष्यभर सत्य, अहिंसा आणि सत्याग्रह यांचा संदेश दिला. आज त्यांच्या जयंतीनिमित्ताने आपण त्यांच्या महत्वाच्या दहा विचारांवर एक नजर टाकूयात. 


1. जगात बदल घडवायचा असेल तर तो बदल प्रथम स्वत:मध्ये घडवा.


2. दुर्बल व्यक्ती कधीही कोणाला क्षमा करु शकत नाही. क्षमा करणे हा सामर्थ्यवान व्यक्तीचा गुणधर्म आहे. 


3. मानवतावादावरचा विश्वास ढळू देऊ नका. मानवतावाद हा अथांग समुद्र आहे. या समुद्रातील काही थेंब प्रदूषित असू शकतात, पण त्यामुळे सर्व समुद्र प्रदूषित होऊ शकत नाही. 


4. प्रतिशोध हा असा गुण आहे जो जगाला आंधळा बनवतो. 


5. अगदी सभ्य मार्गानेही तुम्ही जगाला हादरवून सोडू शकता. 


6. थोडासा संयम हा हजारो उपदेशांपेक्षा अधिक मौल्यवान आहे. 


7. एखाद्या देशाच्या सभ्यपणाची परीक्षा घ्यायची असेल तर त्या देशात प्राण्यांना कशी वागणूक दिली जाते ते पहा. 


8. मनुष्य हा त्याच्या स्वत:च्या विचारांची निर्मिती आहे. तो कसा विचार करतो त्याचप्रमाणे त्याचं चारित्र्य ठरतं. 


9. आपण शांतता प्रस्थापित करण्यासाठी काय विचार करतो, काय बोलतो आणि काय कृती करतो यावर आपलं समाधान अवलंबून आहे. 


10. हिंसेच्या मार्गाने एखादी गोष्ट साध्य होते तेव्हा ते यश तात्पुरतं असतं. पण त्यामुळे होणारं नुकसान मात्र दीर्घकालीन असतं.


संबंधित बातम्या :