नवी दिल्ली : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची 150 जयंती आज देशभर साजरी केली जात आहे. महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त देशभरातून अभिवादन करण्यात येत आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू पंतप्रधान नरेंद्र मोदी,  लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांनी राजघाट येथे जाऊन महात्मा गाधींना अभिवादन केलं.


माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, भाजप कार्याध्यक्ष जेपी नड्डा यांनीही राजघाटावर जाऊन महात्मा गांधींना नमन केलं. भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहादुर शास्त्री यांचीही आज जयंती आहे.


पंतप्रधान नरेंद्र मोदी, सोनिया गांधी आणि मनमोहन सिंग यांनी विजयघाट येथे जाऊन लाल बहादुर शास्त्रींनाही अभिवादन केलं. यावेळी लाल बहादुर शास्त्री यांचे चिरंजीव अनिस शास्त्री हे देखील उपस्थित होते.


नरेंद्र मोदींनी ट्विटरवर लिहिलं की, "राष्ट्रपिता महात्मा गांधींना 150 व्या जयंतीनिमित्त शत-शत नमन. महात्मा गांधींनी मानवतेसाठी मोठं योगदान दिलं. महात्मा गांधींचं स्वप्न साकार करण्यासाठी मेहनत करण्याची आम्ही प्रतिज्ञा करत आहोत."





"जय जवान, जय किसान घोषणा देत देशभरात नवउर्जेचा संचार करणारे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांना शत-शत नमन", असं मोदींनी ट्वीट केलं.