Maharashtra News: तंत्रज्ञानाच्या बाबतीत आपला भारत (India) देश दिवसेंदिवस नवनवीन टप्पे गाठत आहे. याचे ताजे उदाहरण महाराष्ट्रातील (Maharashtra) गडचिरोली येथे पाहायला मिळाले. गडचिरोलीतील एका शाळेत कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence) म्हणून ओळखल्या जाणार्‍या मशिनचा वापर अन्नाचा दर्जा, अन्नाची गुणवत्ता (Food Quality) शोधण्यासाठी केला जात आहे. त्याचबरोबर हे यंत्र बनवण्यामागे पोषण पातळी सुधारण्याचाही उद्देश ठेवण्यात आला आहे.


गडचिरोलीतील एटापल्ली येथील तोडसा आश्रमशाळेत हे मशीन बसवण्यात आले आहे. हे यंत्र जेवणाच्या थाळीचा फोटो काढते, तसेच विद्यार्थ्याचा फोटोही चित्रित करते. त्यानंतर काही सेकंदांनंतर, मशीन अन्नाचा दर्जा चांगला आहे की नाही हे सांगते. कुपोषण दूर करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने हे पाऊल उचलले आहे. यावेळी अधिकाऱ्यांनी सांगितले, आदिवासी भागात राज्य सरकारकडून चालवल्या जाणाऱ्या शाळांमध्ये अभ्यासाबरोबरच पौष्टिक आहाराकडेही विशेष लक्ष दिले जात आहे.


गुणवत्तेसोबत तडजोड नको


आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत राबवण्यात येत असलेल्या या अभियानात स्वयंसेवी संस्थाही मदत करत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. उद्योग यंत्र स्टार्ट अपच्या मदतीने तोडसा आश्रमशाळेत या अन्नाचा दर्जा तपासणारे मशीन बसवण्यात आले आहे. मशीन गुणवत्तेबरोबरच अन्नाच्या प्रमाणावरही विशेष लक्ष देते.


कसे काम करते ही मशीन?


मशिनची काम करण्याची पद्धत देखील अद्वितीय आहे. विद्यार्थी प्रथम मशिनसमोर उभा राहतो आणि आपले जेवणाचे ताट मशिनवर ठेवतो. जेवणासोबत हे यंत्र विद्यार्थ्याच्या ताटाचा आणि विद्यार्थ्याचाही फोटो घेते आणि काही सेकंदातच त्याचा निकाल सांगते. विद्यार्थ्यानुसार जेवणाचा दर्जा चांगला आहे की नाही, किती प्रमाणात जेवण घेणे विद्यार्थ्यासाठी लाभदायक असेल, याचा रिपोर्ट मशिनमध्ये दाखवला जातो.






आदिवासी भागाप्रमाणे शहरी परिसरातही कुपोषणाची लाट


ठाणे जिल्ह्यात 1 हजार 854 अंगणवाड्या आहेत. तीन वर्षांपूर्वी यातील शून्य ते सहा वयोगटातील 1 लाख 11 हजार 883 बालकांपैकी 1 लाख 11 हजार 223 बालकांच्या वजनांची नोंद करण्यात आली होती. त्यापैकी 11 हजार 673 बालके कमी वजनांची आढळली, त्यातही तब्बल 2 हजार 827 मुलांची वजने चिंताजनक आढळली होती. अत्यंत कमी वजनाच्या मुलांची संख्या 101 होती. त्यामुळे आदिवासी तालुक्यांप्रमाणे ठाणे, कल्याण आणि अंबरनाथ या शहरी तालुक्यात ही कुपोषणाने डोके वर काढल्याचे उघड झाले होते. ठाणे तालुक्यात 449 कुपोषित तर 102 अतिकुपोषित मुले, कल्याण तालुक्यात हा आकडा 919 आणि अतिकुपोषितांची संख्या 27 एवढी होती. 


महत्त्वाच्या बातम्या:


Maharashtra New Task Force : राज्यात कोविडसाठी आता नवीन टास्क फोर्स सज्ज, डॉ. सुभाष सांळुखे अध्यक्ष