नवी दिल्ली : महाराष्ट्रात 2019 च्या विधानसभा निवडणुका आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान 2024 मध्ये 32 लाख मतदार जोडले गेले. तथापि, 2024 च्या लोकसभा निवडणुकीत (महाविकास आघाडी) विजयी झालेल्या आणि विधानसभा निवडणुकांमधील 5 महिन्यांच्या कालावधीत 39 लाख मतदार जोडले गेले. प्रश्न असा आहे की, हे 39 लाख मतदार कोण आहेत? ते हिमाचल प्रदेशच्या एकूण मतदारांच्या संख्येइतके आहे. दुसरा मुद्दा असा आहे की, महाराष्ट्रात राज्यातील एकूण मतदार लोकसंख्येपेक्षा जास्त मतदार का आहेत? महाराष्ट्रात अचानक मतदार का निर्माण झाले आहेत? निवडणूक आयोगाने या प्रश्नांची उत्तरे मागूनही दिलेली नाहीत, असा गंभीर आरोप लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला. 






नवी दिल्लीत राहुल गांधी यांच्यासह शिवसेना खासदार संजय राऊत आणि सुप्रिया सुळे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोगावर प्रहार करत पारदर्शक पद्धतीने डेटा सादर करण्याची मागणी केली. राहुल गांधी यांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीची मतदारयादी देण्याची मागणी आयोगाकडे केली आहे. 






राहुल गांधी म्हणाले की, महाराष्ट्र निवडणुकीत अनेक गैरव्यवहार झाले आहेत.पंतप्रधानांनी निवडणूक आयुक्त निवडण्याची पद्धत बदलली. महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीनंतर पाच महिन्यात मतदार का वाढले? 5 वर्षात 44 लाख असताना पाच महिन्यात 39 लाख कसे आले? मतदारयादीत अनेक अनियमितता झाल्या आहेत. त्यामुळे लोकसभा आणि विधानसभा फोटोसह मतदारयादी द्या, अशी मागणी राहुल गांधी यांनी केली. 






इतर महत्वाच्या बातम्या