Mahakumbh Fire News: प्रयागराजमधील महाकुंभ (Mahakumbh) मेळ्यात पुन्हा एकदा भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले. या आगीत अनेक तंबू जळून खाक झाले आहेत. तसेच लाखो रुपयांचं मोठं नुकसान देखील झालं आहे.
महाकुंभाच्या सेक्टर 22 मध्ये ही भीषण आग लागली आहे. त्यामुळे घटनास्थळी एकच गोंधळ उडाला. या जाळपोळीत अनेक तंबू जळून खाक झाले. अग्निशमन दलाच्या पथकाने घटनास्थळी पोहोचून आग विझवण्यास सुरुवात केली. महाकुंभ मेळ्याच्या सेक्टर 22 मधील झुशी परिसरातील छतनांग घाटाजवळ असलेल्या नागेश्वर पंडालमध्ये ही आग लागली आहे. या आगीच्या ज्वाळा लांबच्या अंतरावरुन देखील दिसत होत्या, यावरुन आगीची तीव्रता कळू शकते. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले आहे. अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली आहे.
लाखो रुपयांचं नुकसान, जीवितहानी नाही
महाकुंभ परिसरातील नागेश्वर पंडालला लागलेल्या आगीत मोठं नुकसान झालं आहे. विशेष बाब म्हणजे यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. दुपारी पावणेदोन वाजण्याच्या सुमारास ही आग लागली आहे. या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले असून अनेक तंबू जळून खाक झाले आहेत. पंडालमध्ये उपस्थित सर्व लोक सुरक्षित आहेत. अग्निशमन दलाने अथक परिश्रमानंतर काही मिनिटांत आग आटोक्यात आणली. काही मिनिटांत आग आटोक्यात आणल्यामुळं मोठा अनर्थ टळला आहे. अन्यता मोठी घटना घडली असती. दरम्यान, या आगामुळं अनेक तंबू जळून खाक झाले आहे. मात्र, सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेनी नाही .
19 जानेवारीला देखील लागली होती भीषण आग
प्रयागराजच्या महाकुंभ मेळ्यात 19 जानेवारीला देखील भीषण आग लागल्याची घटना घडली होती. तंबूत असलेल्या सिलेंडरचा स्फोटामुळे ही भीषण आग लागली होती. या आगीमध्ये तंबू आणि इतर साहित्य जळून खाक झालं होतं. प्रयागराजच्या महाकुंभ मेळ्यात मोठी गर्दी असताना लागलेल्या आगीमुळे सर्वांकडून चिंता व्यक्त करण्यात येत आहे. विवेकानंद सेवा समितीचा एक टेंट होता, या टेंटला आग लागली होती. नंतर ती आग पसरत गेली होती. या घटनेत देखील कोणतीही जीवितहानी झालेली नव्हती. आगीमध्ये मोठ्या प्रमामात साहित्य जळून खाक झाले होते.
महत्वाच्या बातम्या: