भोपाळ : राजधानी भोपाळमध्ये राहणाऱ्या एका पतीने हनिमूनच्या नावाखाली पत्नीची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. पती पत्नीला हनिमूनसाठी गोव्यात घेऊन गेला होता, मात्र तो तिला अयोध्या आणि बनारसला घेऊन गेला. त्यामुळे पत्नी संतापली आणि तिने कौटुंबिक न्यायालयात पतीपासून घटस्फोटासाठी अर्ज केला आहे.
हनीमुनला आईला सुद्धा सोबत घेतल्याचा राग
पिपलानी येथील रहिवासी असलेल्या या जोडप्याचे ऑगस्ट 2023 मध्ये लग्न झाले होते. महिलेच्या म्हणण्यानुसार, तिचा नवरा आयटी सेक्टरमध्ये असून त्याला चांगला पगार मिळतो. त्यामुळे हनिमूनसाठी परदेशात जाणे तिच्यासाठी फार मोठी गोष्ट नाही, पण अयोध्या आणि बनारसला गेला आणि सोबत आईला सुद्धा घेतले.
आई-वडिलांची सेवा करायची होती
पतीने हनीमूनला परदेशात जाण्यास नकार देत पत्नीला सांगितले की, मला आई-वडिलांची काळजी घ्यायची आहे, त्यामुळे फक्त इंडियन प्लेसला जावे. ज्याला पत्नीने सहमती दर्शवली आणि पती-पत्नी दोघांचा गोवा आणि दक्षिण भारतात जाण्याचा बेत ठरला.
सहलीवरून परतल्यावर बायकोचा हंगामा
पतीने अयोध्या आणि वाराणसीसाठी विमान तिकीट बुक केले. कारण त्याच्या आईला राम मंदिराच्या अभिषेकपूर्वी शहरात जायचे होते. ट्रिपला जाण्याच्या एक दिवस आधी पतीने पत्नीला सांगितल्यावर पत्नीने कोणताही गोंधळ घातला नाही, मात्र सहलीवरून परतल्यानंतर 10 दिवसांनी तिने पतीला घटस्फोट देण्याचा निर्णय घेतला आणि कोर्टात धाव घेतली. तो माझ्यापेक्षा आपल्या कुटुंबीयांची जास्त काळजी घेतो, असे पत्नीने कोर्टात नमूद केले. भोपाळ कौटुंबिक न्यायालयाचे वकील शैल अवस्थी यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी या जोडप्याचे समुपदेशन केले जात आहे.
हॉटेल्सच्या 'नाईट स्टे'मध्ये बंपर वाढ
दुसरीकडे, राम मंदिर सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर 20 ते 23 जानेवारी दरम्यान अयोध्येत एका रात्रीच्या मुक्कामासाठी एका खोलीची सरासरी किंमत 9 हजार रुपयांवर पोहोचली आहे. होम स्टे आणि हॉटेलच्या किमती 4 हजार ते 19 हजार रुपयांच्या दरम्यान आहेत. हॉटेल नीलकंठ येथे एका रात्रीच्या मुक्कामाची किंमत 23,052 रुपये आहे. श्री राम रेसिडेन्सी येथे एका रात्रीच्या मुक्कामाची किंमत 12,745 रुपये आहे आणि हॉटेल हनुमान जी 16,524 रुपये आहे. अयोध्या मंदिरापासून हॉटेल हनुमान जीचे अंतर फक्त 1.9 किमी आहे. 'रामालयम'मध्ये एका रात्रीच्या मुक्कामाची किंमत 7776 रुपये निश्चित करण्यात आली होती.
याशिवाय अयोध्येला जाण्यासाठी विमाने आणि ट्रेनची मागणीही वाढली आहे. 20 जानेवारीला दिल्ली ते अयोध्या विमानाच्या तिकीट दरातही वाढ झाली आहे. मेक माय ट्रिपच्या वेबसाइटनुसार, 20 जानेवारी रोजी नवी दिल्ली ते अयोध्या पर्यंतच्या तिकिटाची किंमत 15,193 रुपये दर्शविली आहे. 20 जानेवारीसाठी कोणतेही फ्लाइट बुकिंग बाकी नाही. स्पाईस जेट, इंडिगो एअरलाइन्सच्या फ्लाइटचा समावेश असलेल्या 21 आणि 22 जानेवारीचे बुकिंग दाखवले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या