VIDEO : मध्य प्रदेशात पाटिदार नेता हार्दिक पटेलवर शाईफेक
एबीपी माझा वेब टीम | 08 Apr 2018 11:08 AM (IST)
स्वार्थासाठी हार्दिक पटेलने पाटिदार आणि गुर्जर समाजाची फसवणूक केल्याचा आरोप शाईफेक करणाऱ्या तरुणाने केला.
भोपाळ : मध्य प्रदेशातील उज्जैनमध्ये पाटिदार समाजाचा नेता हार्दिक पटेलवर शाईफेक करण्यात आली आहे. मिलिंद गुर्जर या युवकाने हार्दिक पटेलवर शाईफेक केली. उज्जैनमधील एका हॉटेलमध्ये हार्दिक पटेल पत्रकार परिषद घेत असताना ही घटना घडली. या प्रकारानंतर हार्दिक पटेलच्या समर्थकांनी गुर्जरला चांगलाच चोप दिला. पोलिसांनी मिलिंद गुर्जरला अटक केली आहे. स्वार्थासाठी हार्दिक पटेलने पाटिदार आणि गुर्जर समाजाची फसवणूक केल्याचा आरोप या तरुणाने केला. हार्दिक पटेल सध्या मध्य प्रदेशच्या दौऱ्यावर असून स्थानिक शेतकऱ्यांशी संवाद साधत आहे. शनिवारी रात्री झालेल्या पत्रकार परिषदेत त्याने व्यापमं घोटाळ्यावरुन शिवराजसिंग चौहान सरकारवर निशाणा साधला होता.