VIDEO: लग्नाच्या शाही वरातीतील हत्ती बिथरला
एबीपी माझा वेब टीम | 13 Mar 2018 10:28 AM (IST)
वरातीतील हत्ती सैरभर होऊन बिथरल्याने उपस्थित वऱ्हाडी प्रचंड घाबरले.
भोपाळ: लग्नाची वरात शाही करण्यासाठी आणलेले हत्ती घोडे जेव्हा पिसळतात तेव्हा काय होतं, याचा थरारक अनुभव मध्य प्रदेशात आला. मध्य प्रदेशातील सागर शहरात एका सराफाच्या मुलाचं लग्न होतं. लग्नाची जंगी तयारी करण्यात आली होती. मुलाच्या लग्नात हौस पूर्ण करण्यासाठी वडिलांनी कशाचीही कमी ठेवली नाही. वरातीसाठी हत्ती, उंट, घोड्यांचा ताफा आणला होता. मात्र यावेळी वरातीतील मोठमोठ्या आवाजातील गाणी ऐकून एक हत्ती बिथरल्यामुळे, एकच खळबळ उडाली. वरातीतील हत्ती सैरभर होऊन बिथरल्याने उपस्थित वऱ्हाडी प्रचंड घाबरले. जो तो इकडून तिकडे धावू लागला. या धावपळीत अनेक वाहनांचं नुकसान झालं. हत्तीला नियंत्रणात आणण्यासाठी काही लोक मागे मागे धावत होते, पोलीसही त्यांच्या मागे होते. मात्र काही वेळाने माहूताने कसंबसं हत्तीवर नियंत्रण मिळवलं. ही घटना उपस्थितांनी आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केली. VIDEO: