बिहार : रिलायन्स ग्रुपचे चेअरमन अनिल अंबानी यांच्याविरोधात बिहारच्या मधेपुरा कोर्टाने अटक वॉरंट काढला आहे. रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीने एका व्यक्तीच्या अपघाती मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबियांना मोबदला न दिल्याने हे अटक वॉरंट काढण्यात आलं आहे.
मधेपुरा जिल्ह्यातील बेहरी गावाचे रहिवासी सैनी साह यांचा 13 जुलै 2011ला आसामच्या तिलोई गावात ट्रक अपघात झाला होता. त्यांनी रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीकडून विमा काढला होता. पण कंपनीने ते पैसे दिले नाहीत. शेवटी सैनी यांची आई कौशल्या देवी यांनी कंपनी विरोधात कोर्टात दावा दाखल केला होता.
कोर्टाने त्यावर सैनी यांच्या कुटुंबियांस 18 लाख 83 हजार रुपये आणि त्यावर 9% टक्के वार्षिक व्याज देण्याचे आदेश कोर्टाने दिले होते. पण तरीही कौशल्या देवी यांना मोबदला मिळाला नाही. अखेर त्यानी पुन्हा एकदा कोर्टात धाव घेतली. त्यानंतर कोर्टाने कंपनीला दोन वेळा नोटीस पाठवली पण कंपनीने कोणतंही उत्तर आलं नाही.
त्यानंतर कंपनीचे चेअरमन अनिल अंबानी यांना अटक करण्याचा अर्ज कोर्टात दाखल करण्यात आला. तर कोर्टाकडे महाराष्ट्राच्या डीजीपी यांच्या माध्यमातून अनिल अंबानी यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी करण्याची विनंती केली होती. अखेर कोर्टाने विनंती स्वीकारत अनिल अंबानी यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केलं.
अनिल अंबानी यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
06 Aug 2018 08:34 AM (IST)
कोर्टाकडे महाराष्ट्राच्या डीजीपी यांच्या माध्यमातून अनिल अंबानी यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी करण्याची विनंती केली होती. अखेर कोर्टाने विनंती स्वीकारत अनिल अंबानी यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केलं.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -