केंद्रातील मोदी सरकारचे चार वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने भाजपने 29 मे पासून ‘संपर्क फॉर समर्थन’ अभियान सुरु केले आहे. या अभियानाच्या माध्यमातून कला, क्रीडा इत्यादी क्षेत्रातील नामवंत व्यक्तींना भेटून मोदी सरकारने केलेल्या कामांची माहिती दिली जात आहे.
याआधी 22 जुलै रोजी अमित शाह यांनी ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर यांची भेट घेतली होती. त्याहीआधी अभिनेत्री माधुरी दीक्षित, उद्योगपती रतन टाटा आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचीही भेट घेतली होती.
‘संपर्क फॉर समर्थन’ काय आहे?
‘संपर्क फॉर समर्थन’ हे अभियान भाजपने सुरु केले आहे. मोदी सरकारने गेल्या चार वर्षात केलेल्या कामांची माहिती या अभियानाअंतर्गत देशातील मान्यवरांना दिली जाते. त्यांच्याशी मोदींच्या कामांबद्दल चर्चा केली जाते. त्यांची मतं जाणून घेतली जातात. त्यानंतर पक्षाला समर्थन करण्यास विनंती केली जाते.
दरम्यान, या अभियानाअंतर्गत भाजपने आतापर्यंत 4 हजार जणांच्या भेटी घेतल्या आहेत. आणखी एक लाख लोकांच्या भेटी भाजपकडून घेतल्या जाणार आहेत.