नवी दिल्ली - वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेच्या (CSIR) प्रयोगशाळेने सर्वांसाठी खुशखबर आणली आहे. कोरोना व्हायरसची रॅपिड टेस्ट करणारी पेपर स्ट्रिप विकसित केली आहे. सत्यजित राय यांनी ही स्ट्रिप विकसित केली आहे. 'फेलुदा' असं या पेपर स्ट्रिपचं नाव ठेवण्यात आलं आहे. हे किट विकसित करण्यासाठी सीएसआयआर प्रयोगशाळेने मंगळवारी टाटा अॅन्ड सन्सशी यांच्याशी हातमिळवणी केली. या मे महिन्याच्या अखेरीस हे किट वापरण्या करता उपलब्ध होईल अशी माहिती सीएसआयआरने दिली आहे.
'फेलुदा' हा संपूर्ण स्वदेशी वैज्ञानिक शोध आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात आणि वेगाने कोरोना चाचणी करण्यास उपयुक्त आहे. याचं मुख्य वैशिष्ट्ये म्हणजे ही टेस्ट अगदी स्वस्तात उपलब्ध होणार आहे. कोरोना व्हायरसचा प्रकोप दिवसेंदिवस वाढतचं चालला आहे. परिणामी कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी जास्तीत जास्त रुग्णांच्या कोरोना चाचणी करणे आवश्यक आहे. यापूर्वीच कोरोना रॅपिड चाचणीला केंद्राने परवानगी दिली होती. मात्र, चीन वरुन मागवण्यात आलेल्या किटमध्ये काही त्रुटी आढळल्याने हा निर्णय लाबणीवर पडला होता. मात्र, आता हे किट विकसीत झाल्यानंतर त्यांची मोठ्या प्रमाणात मदत आहे.
राज्यात आज 1233 नवे कोरोनाबाधित; कोरोनाबाधितांचा संख्या 16,758
स्वॅब आणि रॅपिड टेस्टिंग मध्ये नेमका फरक काय?
कोविड - 19 च्या निदानासाठी रॅपिड टेस्टिंग प्रमाण मानलं जात नसलं तरी सध्याच्या परिस्थितीत कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी ही पद्धत प्रभावी असल्याचं मानलं जात आहे. रॅपिड टेस्टिंग आणि स्वॅब टेस्टिंगमधला मूळ फरक आहे तो निकालाच्या वेळेचा. पारंपरिक स्वॅब टेस्टिंगचा निकाल कळण्यासाठी जवळपास 24 तास लागू शकतात तर रॅपिड टेस्टिंगच्या माध्यमातून अवघ्या 10 ते 15 मिनिटात रिझल्ट कळू शकतो. स्वॅब टेस्टिंगमध्ये घशातील द्रव्याचे नमुने घेतले जातात. पण रॅपिड टेस्टिंगसाठी रक्ताचे नमुने घेतले जातात. स्वॅबचे नमुने चाचणीसाठी तत्सम लॅबमध्ये पाठवले जातात. मात्र रॅपिड टेस्टिंग किट तिथल्या तिथे निकाल सांगतं.
Ground Report of Corona | काय म्हणतोय गावाकडचा कोरोना | ABP Majha