Puri Jagannath Temple Property : ओदिशातील (Odisha) पुरी येथील जगन्नाथ मंदिर (Jagannath Temple, Puri) भारतातील प्रसिद्ध मंदिरांपैकी एक आहे. भगवान विष्णूच्या जगन्नाथ मंदिरात देश-विदेशातून भक्तगण आणि पर्यटक दर्शनासाठी येत असतात. भगवान जगन्नाथ मंदिराच्या संपत्तीबाबत मोठी मोहिती समोर आली आहे. जगन्नाथ मंदिर ट्रस्टकडे 7 राज्यांमध्ये 60 हजारहून जास्त एकर जमीन असल्याची माहिती समोर आली आहे. ओदिशासह 7 राज्यांमध्ये ही जमी आहे.
पुरीतील जगन्नाथ मंदिराची श्रीमंती!
भगवान जगन्नाथ मंदिराकडे 60822 एकर जमीन असल्याचा मोठा खुलासा ओदिशाचे कायदा मंत्री जगन्नाथ सरका यांनी केला आहे. पुरीच्या जगन्नाथ मंदिराजवळील ही जमीन ओडिशा आणि इतर 6 राज्यांमध्ये पसरलेली आहे. राज्य विधानसभेत बीजेडी आमदाराने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी ही माहिती दिली.
7 राज्यांमध्ये 60822 एकर जमीन
ओडिशाचे कायदा मंत्री जगन्नाथ सरका यांनी विधानसभेत दिलेल्या माहिती दिली की पुरी येथील जगन्नाथ मंदिराची ओडिशा आणि इतर सहा राज्यांमध्ये 60,822 एकर जमीन आहे. बीजेडी सदस्य प्रशांत बेहरा यांनी विचारलेल्या प्रश्नाच्या लेखी उत्तरात त्यांनी याबाबत माहिती दिली आहे. ओडिशाच्या 30 जिल्ह्यांपैकी 24 जिल्ह्यांमध्ये महाप्रभू जगन्नाथ बीजे, श्रीक्षेत्र पुरी ट्रस्टच्या नावावर एकूण 60,426.943 एकर जमीन आहे.
जगन्नाथ मंदिराच्या मालमत्तेबाबत मोठी माहिती
यापैकी श्री जगन्नाथ मंदिर प्रशासनाला (SJTA) 38,061,892 एकर जमिनीचा ताबा अंतिम रेकॉर्ड (ROR) मिळाला झाला आहे, असं त्यांनी सांगितलं. ओदिशाप्रमाणे, इतर सहा राज्यांमध्ये 395.252 एकर जमीन भगवान जगन्नाथ यांच्या नावावर आहे, अशी माहिती सरका यांनी दिली आहे.
बेकायदेशीर अतिक्रमणे काढण्यासाठी मंदिराने राज्यातील विविध तालुक्यांमध्ये यापूर्वी 974 अतिक्रमण प्रकरणे दाखल केली असल्याची माहिती जगन्नाथ सरका यांनी दिली आहे. SJTA अधिकाऱ्यांनी योग्य तपास केल्यानंतर, श्री जगन्नाथ मंदिर अधिनियम, 1955 च्या तरतुदीनुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, अशा माहितीही मंत्र्यांनी दिली आहे.
चार धामपैकी एक जगन्नाथ मंदिर
जगन्नाथ मंदिर हे चार धाम पैकी एक आहे. ओडिशातील पुरी येथी जगन्नाथ मंदिरात बलराम आणि बहीण सुभद्रा यांच्यासह भगवान श्रीकृष्णाची पूजा केली जाते. जिथे भगवान आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षात जगन्नाथ मंदिरात भव्य रथयात्रा काढली जाते. देवशयनी एकादशीला ही रथयात्रा संपते. अनादी काळापासून हा सण श्रद्धेने आणि भक्तिभावाने साजरा केला जातो.
हिंदू पुराणांनुसार, हरि म्हणजे विष्णू आणि हर किंवा शिव हे शाश्वत मित्र आहेत, असं म्हटलं आहे. त्यामुळे जेथे भगवान विष्णूंचा वास आहे, तिथे भगवान शिव देखील असतात, असं मानलं जातं. त्यामुळे प्रभू जगन्नाथवर भक्तांची खूप श्रद्धा आहे.