Lok Sabha 2024 : तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी 2024 च्या लोकसभेच्या निवडणुकीबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. देशात लोकशाही टिकेल की नाही हे 2024 च्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका ठरवतील, असं वक्तव्य मुख्यमंत्री एमके स्टॅलिन (MK Stalin) यांनी केलं आहे. माजी मुख्यमंत्री दिवंगत एम करुणानिधी यांच्या पाचव्या पुण्यतिथीनिमित्त चेन्नईत आयोजीत करण्यात आलेल्या कार्यक्रमात एमके स्टॅलिन बोलत होते. भाजपविरोधी विरोधकांनी मोठ बांधायला सुरुवात केली आहे. विरोधकांनी त्यांच्या आघाडीला इंडिया (India (Indian National Developmental Inclusive Alliance) असे नाव दिले आहे. यासंदर्भात विरोधकांच्या दोन बैठका देखील झाल्या आहेत.  


करुणानिधींचे स्वप्न साकार करण्याची वेळ


2024 ची लोकसभा निवडणूक पाच वर्षांतून एकदा येणारी नाही. तर ही निवडणूक भारतात लोकशाही टिकेल की नाही? हे ठरवण्याची असल्याचे स्टॅलिन म्हणाले. देशासाठी सर्वात आधी तमिळनाडूतून आवाज उठवायला हवा, असे करुणानिधी नेहमी म्हणत होते.आता आम्ही त्याच मार्गाने जात असल्याचे स्टॅलिन म्हणाले. द्रमुक हा एक प्रादेशिक पक्ष आहे असून, आता करुणानिधींचे स्वप्न साकार करण्याची वेळ आली असल्याचे स्टॅलिन म्हणाले. प्रत्येक राज्यांना त्यांचे योग्य हक्क मिळावे यासाठी हीच डीएमकेची भूमिका असल्याचे स्टॅलिन यावेळी म्हणाले. दरम्यान, एमके स्टॅलिन यांनी यापूर्वी निवडणुकीच्या मुद्यावरुन भाजपवर टीका केली आहे.  भाजपने पुन्हा सत्ता काबीज केल्यास लोकशाही, सामाजिक न्याय आणि संविधान कोणीही वाचवू शकणार नाही, असे स्टॅलिन म्हणाले होते.


भाजपविरोधात विरोधकांची आघाडी


भाजपविरोधी देशातील 26 पक्षांनी एकत्र येऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (रालोआ) आव्हान दिले आहे. त्यासाठी विरोधकांनी आघाडीला 'इंडिया' असे नाव दिले आहे. 2024 च्या निवडणुकीची रणणिती ठरवण्यासाठी विरोधकांच्या आत्तापर्यंत दोन बैठका झाल्या आहेत एक बैठक पाटणा इथं तर दुसरी बैठक बंगळुरु इथं झाली होती. आता तिसरी बैठक ही मुंबईत होणार आहे. विरोधकांनी भाजपाविरोधात मोट बांधल्यानंतर या आघाडीला इंडिया असे नाव देण्यात आले आहे. तृणमूल काँग्रेसने पुन्हा एकदा नव्याने या आघाडीत प्रवेश केला आहे. तर, यावेळी अरविंद केजरीवाल यांचा आम आदमी पक्ष आघाडीचा भाग झाला आहे. तसेच महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना (ठाकरे गट) यांचा देखील या विरोधकांच्या आघाडीत समावेश आहे.   


महत्त्वाच्या बातम्या:


INDIA Alliances Meet : विरोधकांच्या 'इंडिया' आघाडीची मुंबईतील बैठक लांबणीवर, आता 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबरला होणार बैठक