Loksabha Election 2024 : आगामी लोकसभा निवडणुकांच्या (Loksabha Election 2024) पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी हालचाली सुरु केल्या आहेत. भाजपविरोधात एकत्र लढण्यासाठी विरोधी पक्षांचे प्रयत्न सुरु आहेत. विरोधी पक्षांची पहिली बैठक पाटणा इथं झाल्यानंतर आता बंगळुरुमधील ताज वेस्ट एंड या पंचतारांकित हॉटेलमध्ये विरोधकांनी बैठक आयोजीत केली आहे. या बैठकीचा आजचा दुसरा दिवस आहे. या बैठकीनंतर विरोधी पक्षांची पत्रकार परिषद देखील पार पडणार आहे. तर दुसरीकडं भाजपकडून दिल्लीत एनडीएच्या (NDA) बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. या बैठकीला भाजपचे काही जुने मित्र पक्ष सुद्धा उपस्थित राहणार आहेत.


शरद पवारही आज उपस्थित राहणार 


आज बंगळुरुमध्ये होणाऱ्या बैठकीसाठी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे खासदार संजय राऊत रवाना झाले आहेत. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार हेदेखील या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. ते आज सकाळी बंगळुरुला रवाना होणार असल्याची माहिती मिळत आहे. 2024 च्या निवडणुकीत भाजप विरोधात एकजुट होण्यासाठी विरोधकांची चर्चा सुरु आहे. 


23 जूनला झाली होती पहिली बैठक


बिहारची राजधानी पाटण्यामध्ये 23 जूनला विरोधी पक्षांचे नेते एकत्र येत आले होते. 2024च्या लोकसभा निवडणुकांच्या दृष्टिने रणनीती ठरविण्यासाठी विरोधी पक्षांचे नेते बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या निवासस्थानी एकत्र आले होते. महाराष्ट्रातून या बैठकीसाठी सहा महत्त्वाचे नेते गेले होते. शिवसेनेकडून (उद्धव बाळासाहेब ठाकरे) स्वतः उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत  तर राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे या देखील उपस्थित होत्या. 


सोनिया गांधींची उपस्थिती


विरोधकांची बैठकीत काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी या देखील उपस्थित आहेत. कालच्या पहिल्या दिवशी सोनिया गांधींसह काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, खासदार राहुल गांधी, टीएमसी चीफ आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बनर्जी, बिहारचे मुख्यमंत्री आणि जेडीयूचे नेते नीतीश कुमार, डीएमके प्रमुख आणि तमिळनाडुचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन, राजदचे लालू प्रसाद उपस्थित होते. याचबरोबर उद्धव ठाकरे, झारखंड मुक्त मोर्चाचे नेते आणि मुख्यमंत्री हेमंत सोरेन, आम आदमी पार्टी प्रमुख दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव, नॅशनल कॉन्फ्रेंसचे अध्यक्ष फारुक अब्दुल्ला, पीडीपी प्रमुख मेहबूबा मुफ्ती हे सर्व नेते उपस्थित आहेत. 


एनडीएची आज दिल्लीत बैठक 


भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी आज एनडीएची बैठक बोलावली आहे. या बैठकीला भाजपचे 38 घटक पक्ष उपस्थित राहणार आहेत. यावेळी बोलताना जे पी नड्डा यांनी विरोधी पक्षांच्या बैठकीवर जोरदार टीका केली आहे.  विरोधी पक्षांकडे ना नेता, ना क्षमता, ना धोरण, ना निर्णय घेण्याची ताकद असल्याचे नड्डा म्हणाले.


महत्त्वाच्या बातम्या:


BJP Alliance Meeting: विरोधकांची बेंगळुरुमध्ये तर भाजपच्या मित्रपक्षांची दिल्लीत बैठक, NDA च्या बैठकीत 38 पक्ष सामील होणार