Lok Sabha Election 2024 : 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha Election 2024) तयारी सर्वच पक्षांनी सुरु केली आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींची (PM Narendra Modi) लोकप्रियता कोणापासून लपलेली नाही. नरेंद्र मोदींची भारतातच नव्हे तर परदेशातही प्रचंड लोकप्रियता आहे. पंतप्रधान मोदींनी अद्याप निवृत्ती घेण्याचा कोणताही विचार केलेला नसला तरी एका  सर्व्हेक्षणात पीएम मोदींचा उत्तराधिकारी झाल्यास सर्वात योग्य उत्तराधिकारी कोण असेल हे शोधण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.


इंडिया टुडे आणि सी व्होटर यांनी एका सर्व्हेक्षणाच्या माध्यमातून देशातील जनतेचा अंदाज जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. या सर्व्हेक्षणात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उत्तराधिकाऱ्याबाबत जनतेचा कौल नेमका कोणाकडे असेल याचा अंदाजही जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. 


पीएम मोदींच्या उत्तराधिकार्‍यांमध्ये चुरशीची लढत 


देशाच्या जनतेच्या दृष्टीने  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पहिल्या क्रमांकावर आहेत. देशातील 52.5 टक्के लोकांनी नरेंद्र मोदींना 2024 च्या पंतप्रधानपदासाठी आपली पहिली पसंती असल्याचे सांगितले आहे. पंतप्रधानांच्या उत्तराधिकाऱ्यांच्या शर्यतीत ज्या नेत्यांचा समावेश आहे त्यामध्ये पहिलं नाव अमित शहा यांचं आहे. तर, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ त्यांना जबरदस्त टक्कर देत आहेत.


अमित शहा पहिल्या क्रमांकावर 


26 टक्के लोकांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांना पंतप्रधान मोदींचा उत्तराधिकारी म्हणून पहिल्या क्रमांकावर पाठिंबा दिला आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना 25 टक्के लोकांची पसंती मिळाली आहे. 


उत्तराधिकाऱ्यांच्या शर्यतीत केंद्रीय रस्ते, वाहतूक मंत्री नितीन गडकरींचाही (Nitin Gadkari) समावेश आहे. नितीन गडकरी यांना या पदासाठी योग्य मानणारे जवळपास 16 टक्के लोक आहेत. तर, पंतप्रधान मोदींचे उत्तराधिकारी म्हणून 6 टक्के लोकांची पसंती देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) आहेत.


कोणाचं सरकार असणार?


आज देशात लोकसभा निवडणुका झाल्या तर कोणाचं सरकार स्थापन होणार? या प्रश्नाला उत्तर देताना बहुमत एनडीए सरकारच्या बाजूने आले आहे. सर्व्हेक्षणानुसार लोकसभेच्या 543 जागांपैकी एनडीए आघाडीला 298 जागा मिळत आहेत. त्याचवेळी काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीएला 153 जागा मिळत आहेत. इतरांना 92 जागा मिळणार आहेत. टक्केवारीबद्दल बोलायचे झाल्यास एनडीएला 43 टक्के, यूपीएला 30 टक्के तर इतरांना 27 टक्के मते मिळाली आहेत.


महत्त्वाच्या बातम्या : 


Delhi : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू की पंतप्रधान नरेंद्र मोदी कोणाची कार सर्वात पॉवरफुल? वैशिष्ट्ये आणि किंमत ऐकून तुम्हीही थक्क व्हाल