Lok Sabha Election 2024: 2024 च्या लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election) भाजपच्या (BJP) विरोधात विरोधकांनी एकजुट केली आहे. तसेच, आगामी 2024 च्या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विरोधकांच्या बैठकांच्या फेऱ्याही सुरू आहेत. यावर विरोधी पक्षांचे नेते एकमेकांच्या भेटीगाठी घेत आहेत, मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या विरोधात विरोधकांकडून कोण उभं राहणार? हा प्रश्न गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. पंतप्रधान मोदींना (PM Modi) टक्कर देण्यासाठी विरोधकांकडून मैदानात कोण उतरणार? याचंच उत्तर जाणून घेण्यासाठी एक सर्वेक्षण करण्यात आलं. 


दरम्यान, CSDS नं NDTV साठी सर्वेक्षण केलं आहे. या सर्वेक्षणात 2024 मध्ये कोणते नेते पंतप्रधान मोदींना आव्हान देऊ शकतात, असं विचारण्यात आलं होतं. यावर बहुतांश लोकांनी काँग्रेस (Congress) नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना आपली पसंती असल्याचं सांगितलं. सर्वेक्षणानुसार, 34 टक्के लोकांचा असा विश्वास आहे की, राहुल गांधी पंतप्रधान मोदींना आव्हान देऊ शकतात.


दुसरीकडे, 11 टक्के लोकांनी दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे (AAP) राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांचं आव्हान 2024 लोकसभा निवडणुकीत मोदींसमोर असेल असं म्हटलं आहे. तर 4 टक्के लोकांनी टीएमसी प्रमुख आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) 2024 लोकसभा निवडणुकीत मोदींना आव्हान देऊ शकतात, असं म्हटलं आहे.


अखिलेश यादव यांचं आव्हान 


सर्वेक्षणात दावा करण्यात आला आहे की, 5 टक्के लोकांनी उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव (Akhilesh Yadav) पंतप्रधान मोदींना आव्हान देऊ शकतात. दुसरीकडे, 9 टक्के लोक असं म्हणतात की, कोणताही नेता पीएम मोदींसाठी आव्हान नाही. तर 12 टक्के लोकांनी सांगितलं की, ते या प्रश्नावर काहीबी बोलू इच्छित नाहीत. याशिवाय 25 टक्के लोकांनी इतरांना आव्हान मानलं आहे.


भाजपविरोधात विरोधकांची एकजूट 


काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) आणि राहुल गांधी यांची भेट घेतल्यानंतर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी विरोधी पक्षांच्या ऐक्याबाबत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासह अनेक नेत्यांची भेट घेतली आहे. यादरम्यान सर्वांनी एका गोष्टीचा पुनरुच्चार केलाय की, आगामी काळात विरोधी पक्षांच्या भविष्यातील रणनीतीवर चर्चा होऊ शकते.


महत्त्वाच्या इतर बातम्या :