नवी दिल्ली : लॉकडाऊन-3 लागू केल्यानंतर महसूल मिळावा यासाठी सरकाने दारूची दुकानं उघडी ठेवण्याची परवानगी दिली. मात्र लोकांना दारुच्या दुकानांसमोर लांबच लांब रांगा लावल्या आणि सोशल डिस्टन्सिंगची ऐशीतैशी केली. त्यामुळे अनेक ठिकाणी दारूची दुकानं बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनानं घेतला. मात्र मद्यपींना दारूची होम डिलिव्हरी देण्याचा फूट डिलिव्हरी अॅप झोमॅटो विचार करत आहे. देशभरातील दारूनची मागणी लक्षात घेत झोमॅटो याबाबत विचार करत आहे.


झोमॅटोची सीईओ मोहित गुप्ता यांनी म्हटलं की, टेक्नोलॉजीचा वापर करुन दारूची होम डिलिव्हरी करण्यात आली तर दारूची विक्री केली जाऊ शकते. कोरोना व्हायरसचे रुग्ण ज्या भागात कमी आहेत, त्याच भागात दारुची डिलिव्हरी केली पाहिजे. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर हॉटेल्स, रेस्टॉरंट बंद आहेत. त्यामुळे झोमॅटोने ग्रॉसरी डिलिव्हरी सुरु केली आहे. आता दारुची वाढती मागणी लक्षात घेत दारूची डिलिव्हरी करण्याचाही झोमॅटो विचार करत आहे.


कायदेशीररित्या पाहिलं तर यावेळी दारूच्या होम डिलिव्हरीसाठी कायद्यात तरतूद नाही. अल्कोहोल इंडस्ट्री बॉडी इंटरनॅशनल स्पिरिट्स अँड वाईन असोसिएशन ऑफ इंडिया (आयएसडब्ल्यूएआय) सरकारकडून दारूची होम डिलिव्हरी मान्यता मिळावी यासाठी प्रयत्न करत आहे. सरकारने परवानगी दिल्यास लवकरच झोमॅटो दारूची होम डिलीव्हरी करेल.