अयोध्या : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सहकुटुंब रामलल्लाचं दर्शन घेतलं आहे. यावेळी पत्नी रश्मी ठाकरे, मुलगा आदित्य ठाकरे हे यावेळी उपस्थिती होती. शिवसैनिकांनी यावेळी जोरदार घोषणाबाजी केली. काहीच वेळात उद्धव ठाकरे पत्रकार परिषद घेणार आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे पत्रकार परिषदेत काय बोलणार याकडे अवघ्या देशाचं लक्ष लागलं आहे.

उद्धव ठाकरेंच्या मार्गावर शिवसैनिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. कालच उद्धव ठाकरेंनी शरयू नदीच्या किनाऱ्यावर महाआरती केली होती. शरयू नदीच्या तिरावर उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या हस्ते आरती करण्यात आली. यावेळी राम मंदिराच्या निर्मितीसाठी जर अध्यादेश आणला तर शिवसेना सरकारला पाठिंबा देईल, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

LIVE UPDTAE

  • उद्धव ठाकरे यांनी सहकुटुंब रामलल्लाचं दर्शन घेतलं
  • प्रभू रामाचं दर्शन घेऊन उद्धव ठाकरे हॉटेलमध्ये पोहोचले
  • थोड्याचे वेळात पत्रकार परिषद घेणार
  • उद्धव ठाकरे सहकुटुंब राम जन्मभूमीवर दाखल
  • शिवसेनेचे निवडक नेते ठाकरे कुटुंबीयांसोबत उपस्थित आहेत
  • राम जन्मभूमीवर भक्तांकडून 'जय श्री राम'च्या घोषणा
  • राम जन्मभूमी येथे शिवसैनिकांची आणि भक्तांची मोठी गर्दी
  • राम जन्मभूमी येथे शिवसैनिकांची जोरदार घोषणाबाजी
  • रामजन्मभूमी कडे जाणाऱ्या सर्व मार्गांची नाकाबंदी करण्यात आली
  • उद्धव ठाकरे आज सहकुटुंब प्रभू श्रीरामांचं दर्शन घेणार
  • उद्धव ठाकरे राम जन्मभूमीकेड रवाना
  • थोड्याच वेळात रामजन्मभूमीव पोहोचणार
  • राम जन्मभूमीवर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
  • मार्गावर शिवसैनिकांनी जोरदार घोषणा करत उद्धव ठाकरेंचं स्वागत

काल उद्धव ठाकरे यांनी राममंदिर उभारण्यासाठी सरकारला अल्टिमेटम दिला आहे. राममंदिरासाठी किती दिवस वाट बघावी लागणार असल्याचा सवाल करत राम मंदिर कधी उभारणार याची तारीख सांगा, अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी सरकारला इशारा दिला आहे.

शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवनेरीहून आणलेल्या मातीची अयोध्येत पूजा केली. या पूजेनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद केला. आता हिंदू वाट बघणार नाही, तो प्रश्न विचारणारच असे सांगत संसदेत कायदा केला तर शिवसेना पाठीशी राहिल मात्र राम मंदिर कधी उभारणार याची तारीख सांगा असे ठाकरे म्हणाले. अयोध्येत रामाच्या दर्शनासाठी आलो, राजकारणासाठी नाही असे सांगत पहिल्यांदाच अयोध्येत आलोय, आता वारंवार येत राहणार असेही ते म्हणाले.

काल शरयू नदीच्या तिरावर उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या हस्ते आरती करण्यात आली. इतिहासात पहिल्यांदाच संपूर्ण ठाकरे कुटुंब अयोध्या वारीच्या निमित्ताने राजकीय सीमोल्लंघन केले आहे.रला दिलं.

संबंधित बातम्या

राममंदिर कधी उभारणार? तारीख सांगा, उध्दव ठाकरेंचं सरकारला अल्टिमेटम

उद्धव ठाकरेंकडून शरयू नदीची पूजा, 2100 दिव्यांनी उजळणार नदीचा काठ