Nitin Gadkari : गेल्या नऊ वर्षांत देशातील राष्ट्रीय महामार्गांची एकूण लांबी सुमारे 59 टक्क्यांनी वाढली आहे. या वाढीमुळं भारताकडे आता अमेरिकेनंतर दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे रस्ते जाळे  झाल्याचे वक्तव्य केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Minister Nitin Gadkari) यांनी केलं. नवी दिल्लीत (Delhi) आयोजीत केलेल्या पत्रकार परिषदेत गडकरी बोलत होते. ईशान्येकडील रस्ते महामार्गाच्या जाळ्याच्या विस्तारावर विशेष भर देण्यात आला आहे. या प्रदेशात दोन लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाचे प्रकल्प राबवले जात असल्याचं गडकरींनी सांगितलं.


राष्ट्रीय महामार्गाच्या बाजूने 670 सुविधा विकसित 


ईशान्य भागात महामार्गाच्या जाळ्याच्या विस्तारावर विशेष भर दिला जात आहे. या प्रदेशात दोन लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे प्रकल्प राबवले जात आहेत. प्रवासाचा सुखद अनुभव मिळावा यासाठी राष्ट्रीय महामार्गाच्या बाजूने 670 सुविधा विकसित केल्या जात असल्याची माहिती गडकरींनी दिली. दिल्ली रिंगरोड प्रकल्पासाठी रस्ते बांधणीत 30 लाख टन कचरा वापरला आहे. हे कचरा व्यवस्थापन आणि शाश्वत पायाभूत सुविधांच्या विकासाविषयीच्या सक्रिय दृष्टीकोनाचे द्योतक आहे, असे ते म्हणाले. त्यांनी बांबू क्रॅश बॅरिअर्सविषयी माहिती दिली .हे बांबू बॅरिअर्स रोजगाराच्या संधी निर्माण करण्याबरोबरच पर्यावरणीय शाश्वततेला चालना देत रस्ते अधिक  टिकाऊ बनवतात असे ते म्हणाले.


चौपदरी राष्ट्रीय महामार्गांमध्ये दुप्पट वाढ 


2013-14 मध्ये राष्ट्रीय महामार्गांची एकूण लांबी 91,287 किमी होती. ती 2022-23 मध्ये 1,45,240 किमीपर्यंत वाढलल्याचे गडकरी म्हणाले. या कालावधीत ही लांबी 59 टक्क्यांपेक्षा अधिक  वाढली आहे. 
गेल्या नऊ वर्षांत चौपदरी राष्ट्रीय महामार्गांमध्ये सुमारे दुप्पट वाढ झाली आहे. 2013-14 मध्ये चौपदरी राष्ट्रीय महामार्गांची  लांबी 18,371 किमी होती. जी गेल्या नऊ वर्षात 44,654 किमी झाली असल्याचे गडकरींनी सांगितले. फास्टॅग  (FASTag) लागू झाल्यामुळं पथकर संकलनात लक्षणीय वाढ झाली आहे. पथकारामधून  मिळणारा महसूल 2013-14 मधील  4,770 कोटी रुपयांवरून 2022-23 मध्ये 41,342 कोटी रुपयांवर पोहोचल्याचे गडकरी म्हणाले. 2030 पर्यंत पथकर महसूल 1,30,000 कोटी रुपयांपर्यंत वाढवण्याचे सरकारचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले. 


फास्टॅगने पथकर भरण्याच्या  संकल्पनेत क्रांती घडवून आणली आहे. रोख व्यवहारांची गरज संपुष्टात आणली आहे , असे गडकरी म्हणाले. एका संशोधनानुसार,  या महत्वाच्या उपक्रमामुळे  पथकर नाक्यांवर  वाहने थांबल्यामुळं  वाया जाणार्‍या इंधन खर्चात अंदाजे 70,000 कोटी रुपयांची बचत झाल्याचे गडकरी म्हणाले. शाश्वत भविष्यासाठी सरकारच्या वचनबद्धतेला अनुसरुन पुढील पाच वर्षांमध्ये इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढवणे, स्वच्छ ऊर्जेला चालना देणे आणि कार्बन उत्सर्जन कमी करणे हा दृष्टीकोन असल्याचे गडकरी म्हणाले. 


महत्त्वाच्या बातम्या:


Nitin Gadkari : अनेक ठेकेदारांनी माझ्या शिव्या खाल्या, एक-दोन वेळेस तर त्यांना मारण्याची वेळही आली; नितीन गडकरींनी सांगितल्या त्या आठवणी