लेह : बॉलिवूड अभिनेता आमीर खानची प्रमुख भूमिका असलेला '3 इडियट्स' या चित्रपटाला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं. या चित्रपटात जम्मू काश्मीरच्या लेहमधील 'द ड्रूक पद्मा कारपो स्कूल' ही शाळा दाखवली होती. सिनेमातील एका दृश्यामुळे या शाळेची भिंत एवढी प्रसिद्ध झाली की, त्या भिंतीला 'रँचो वॉल' असं नावंही देण्यात आलं होतं. परंतु पर्यटकांचं आकर्षण ठरलेली ही भिंत पाडण्याचा निर्णय शाळेच्या प्रशासनाने घेतला आहे. तसंच पर्यटकांच्या प्रवेशावरही बंदी घालण्यात येणार आहे.
भिंतीला 'रँचो वॉल' असं नाव
'3 इडियट्स'मध्ये शाळेच्या या भिंतीचा एक सीन होता, ज्यात चतूर नावाचं पात्र त्यावर लघुशंका करतो आणि शाळेतील विद्यार्थ्यांनी बनवलेल्या एका स्वदेशी आविष्कारामुळे चतूरला त्यावेळी विजेचा झटका लागतो. शाळेने ही भिंत 'रँचो वॉल' म्हणून रंगवली आणि मग पर्यंटकांसाठी ती भिंत फोटो पॉईंट बनली होती.
शाळा प्रशासनाची बाजू
शाळेचे प्राध्यापक स्टेनजिन कुनजेंग म्हणाले की, 'या सिनेमामुळे शाळेला प्रसिद्धी मिळाली आणि लडाखला येणाऱ्या पर्यटकांसाठी हे पर्यटन स्थळ बनलं. पण यामुळे परिसरात शाळा उभारण्याचा उद्देश यशस्वी होताना दिसत नाही. शाळेत येणाऱ्या पर्यटकांमुळे विद्यार्थ्यांचं केवळ लक्ष विचलित होत नाही तर परिसरही अस्वच्छ झाला होता.
शाळेचा उद्देश लडाखच्या मुलांना आधुनिक शिक्षण देणं हा होता. असं शिक्षण जे त्यांना त्यांच्या संस्कृतीशी जोडून ठेवेल, त्यांना आनंदी आणि सकारात्मक आयुष्य जगण्यासाठी तयार करु शकेल. परंतु पर्यटकांची संख्या वाढल्याने आम्ही आमच्या उद्देशापासून भरकटत आहोत, असं कुनजेंग यांनी सांगितलं.
'3 इडियट्स'ची 'रँचो वॉल' पाडणार, कारण...
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
25 Sep 2018 03:15 PM (IST)
परंतु पर्यटकांचं आकर्षण ठरलेली ही भिंत पाडण्याचा निर्णय शाळेच्या प्रशासनाने घेतला आहे. तसंच पर्यटकांच्या प्रवेशावरही बंदी घालण्यात येणार आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -