नवी दिल्ली : भारतात विक्री होत असलेल्या पेप्सी, कोका कोला, माऊंटन ड्यू, स्प्राईट आणि 7अप या पाच शीतपेयांच्या नमुन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात धातू, शिसे, कॅडियम, क्रोमियम आढळले आहेत. आरोग्य राज्यमंत्री फग्गनसिंह कुलस्ते यांनी मंगळवारी राज्यसभेत हे उत्तर दिलं.


एका प्रश्नाला दिलेल्या उत्तरात कुलस्ते म्हणाले की, "ड्रग टेक्निकल अडव्हायजरी बोर्डाने (डीटीएबी) या पाच शीतपेयांचे नमुने घेतले होते. हे नमुने कोलकाताच्या नॅशनल टेस्ट हाऊसमध्ये पाठवण्यात आले होते." या शितपेयांमध्ये विषारी घटक असल्याचं तपासणीतून समोर आलं.

पेप्सी, 7अप आणि माऊंटन ड्यू हे पेप्सिको कंपनीची तर स्प्राईट आणि कोका कोला हे कोका कोला कंपनीची उत्पादनं आहेत.

आरोग्य मंत्रालयाने यावर्षी एप्रिल महिन्यात कोलकाताच्या ऑल इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ हायजीन अँड पब्लिक हेल्थला (एआयआयएचअँडपीएच) शेतपेयं, मद्य, ज्यूस आणि काही पेयांची तपासणी करण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर या पाच शीतपेयांची नमुने घेतले होते.