Karnataka Hijab Row : हिजाब प्रकरणी कर्नाटक उच्च न्यायालयात आज महत्वपूर्ण सुनावणी झाली. शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाब बंदी योग्यच असल्याचा निर्णय कर्नाटक उच्च न्यायालयानं दिला आहे. शैक्षणिक संस्थाची शिस्त महत्वाची असल्याचेही सांगण्यात आले आहे. महाविद्यालयांमध्ये हिजाब घालण्याची परवानगी मागणारी मुस्लिम विद्यार्थिनींची याचिकाही उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. दरम्यान, न्यायालयाच्या या निर्णयानंतर अनेकांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. 


 हा निर्णय वैचारिक क्रांती घडवून आणेल - उज्वल निकम 


काही दिवसांपूर्वी कर्नाटकमध्ये हिजाब प्रकरणावरुन वादंग निर्माण झाले होते. त्याचे पडसाद देशभर पडले होते. दरम्यान, आज कर्नाटक न्यायालयाने दिलेल्या निर्णयावर ज्येष्ठ वकील उज्वल निकम यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शैक्षणिक संस्थांमध्ये शिस्त महत्वाची असते. त्याठिकाणी कोणत्याही प्रकारचा धार्मिक पगडा असू नये असे ते म्हणाले. अभिव्यक्ती स्वातंत्र्य याचा अर्थ कशाचेही स्वातंत्र्य आहे असे नाही असेही निकम म्हणाले. आज न्यायालयाने दिलेला निर्णय वैचारिक क्रांती घडवून आणेल असेही निकम म्हणालेत.  शिक्षण हे कोणत्याही धार्मिक गोष्टीपासून दूर असले पाहिजे. शिक्षण संस्थांच्या नियमानुसार राहावेच लागेल. 


कर्नाटक न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत : शमसुद्दीन तांबोळी


जी निरक्षणे कर्नाटक न्यायालयाने नोंदवली आहेत, ती वस्तुस्थितीला धरुन आहेत. या निर्णयाचे मुस्लिम सत्यशोधक मंडळाच्या वतीने स्वागत करतो असे मत मुस्लिम धर्माचे अभ्यासक शमसुद्दीन तांबोळी यांनी म्हटले आहे. धर्मवाद्यांना बाजूला ठेवून न्यायालयाने घेतलेला निर्णय आहे. मुस्लिम बांधवांनी आपल्या विकासासाठी सामाजिक सुधारणांचा अंगीकार केला पाहिजे, असे केले तर वादाचे मुद्दे पुढे येणार नाहीत असे तांबोळी यांनी म्हटले आहे. 


दरम्यान, हिजाब प्रकरणी कर्नाटक उच्च न्यायालयात आज सुनावणी पार पडली आहे. त्यामुळे कर्नाटक राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये कलम 144 लागू करण्यात आलं आहे. तसेच राज्यात आज शाळा, महाविद्यालयं बंद करण्यात आली आहेत. कर्नाटक उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती रितू राज अवस्थी यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठानं आज सकाळी हिजाबच्या मुद्द्याबाबत निकाल जाहीर केला. 


महत्त्वाच्या बातम्या: