Coronavirus Cases Today in India : गेल्या काही दिवसांपासून देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत कमीलीची घट होताना दिसत आहे. कोरोनाचा धोका कमी झाल्याने देशतील नागरिकांना दिलासा मिळत आहे. दरम्यान, गेल्या 24 तासात देशात 2 हजार 568 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर 97 जणांचा कोरोनामुळं मृत्यू झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. कालच्यापेक्षा आज कोरोना रुग्णांच्या संख्येत किंचीत वाढ झाली आहे. काल देशात 2 हजार 503 रुग्णांची नोंद झाली होती, तर 27 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता.


सक्रिय रुग्णांच्या संख्येतं कमीलीची घट 


केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, काल देशात 4 हजार 722 लोक कोरोनातून बरे झाले होते. त्यानंतर सक्रिय रुग्णांची संख्या 33 हजार 917 वर आली आहे. त्याचबरोबर आत्तापर्यंत कोरोनामुळं जीव गमावणाऱ्यांची संख्या ही 5 लाख 15 हजार 974 झाली आहे. तर आत्तापर्यंत 4 कोटी 24 लाख 46 हजार 171 लोक कोरोनातून बरे झाले आहेत. 


 





दिल्लीत 136 नवीन रुग्ण, एकाही रुग्णाचा मृत्यू नाही


सोमवारी राजधानी दिल्लीत कोरोनाच्या नवीन 136 रुग्णांची नोंद झाली असून गेल्या 24 तासात एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. आरोग्य विभागाने जारी केलेल्या आकडेवारानुसार, संसर्गाचे प्रमाण 0.56 टक्के नोंदवले गेले आहे. संसर्गाच्या नवीन प्रकरणांनंतर, दिल्लीतील एकूण संक्रमितांची संख्या 18 लाख 63 हजार 070 झाली आहे. दिल्लीत कोविड-19 मुळे आतापर्यंत 26 हजार 141 लोकांचा मृत्यू झाला आहे. राष्ट्रीय राजधानीत सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 693 आहे.


आतापर्यंत 180 कोटींहून अधिक डोस 


देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत कोरोना लसींचे 180 कोटींहून अधिक डोस देण्यात आले आहेत. काल देशात 19 लाख 64 हजार 423 डोस देण्यात आले आहेत. त्यानंतर आतापर्यंत 180 कोटी 40 लाख 28 हजार 891 डोस लसीचे डोस देण्यात आले आहेत. 


चीनमध्ये कोरोनानं पुन्हा काढलं डोकं वर 


चीनमध्ये कोरोनाच्या रुग्णसंख्येत पुन्हा वाढ होत आहे. चीनमध्ये काल 5 हजार 280 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. चीनमधील जिलिन प्रांतात सर्वाधिक रुगण आढळले आहेत.  झाला आहे. 


महाराष्ट्रातील स्थिती


राज्यातील कोरोनाची रुग्णसंख्या आटोक्यात येत असल्याचं चित्र असून काल राज्यात 157 रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच गेल्या चोवीस तासात एका रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात गेल्या 24 तासात 298  रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. दरम्यान, राज्याचा मृत्यूदर 1.82 टक्के झाला आहे. राज्यात आतापर्यंत 77,21, 220  रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.09 टक्के झाले आहे. 


महत्त्वाच्या बातम्या: