मुंबई : आयकर विवरण पत्र अर्थात इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करण्यासाठी दिलेली मुदतवाढ आज संपते आहे. करदात्यांच्या सोयीसाठी आज मध्यरात्रीपर्यंत आयकर विभागाची कार्यालये सुरु राहणार आहेत.


आयटी रिटर्न फाईल करण्याची 31 जुलै ही शेवटची मुदत असते. पण करदात्यांचा वाढता ओघ लक्षात घेता, प्रशासनाने ही मुदत 5 ऑगस्टपर्यंत वाढवली होती. ती मुदतवाढ आज संपणार आहे.

संबंधित बातमी : आयटी रिटर्न कसे भरावे? सोप्या टिप्स!


करदात्यांना आयटी रिटर्न भरण्यासाठी येत असलेल्या अडचणी लक्षात घेऊन, मुदतवाढ देण्यात येत आहे, असं प्रशासनाने म्हटलं होतं.