इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याच्या मुदतीत 5 दिवसांनी वाढ
एबीपी माझा वेब टीम | 29 Jul 2016 05:59 PM (IST)
नवी दिल्ली : इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची मुदत 5 ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आली आहे. त्यामुळे इन्कम टॅक्स रिटर्न भरण्यासाठी आणखी 5 दिवसांचा अवधी मिळणार आहे. यापूर्वी रिटर्न भरण्याची मुदत 31 जुलैपर्यंत होती. मात्र बँकांच्या संपामुळे सरकारनं 5 ऑगस्टपर्यंत मुदत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकार बँकिग क्षेत्रात करत असलेल्या विविध बदलांना विरोध म्हणून आज देशभरातील बँकांचा एकदिवसीय संप आहे. त्यामुळे शनिवार, रविवार पकडून 3 दिवस सलग बँका बंद असणार आहेत. यामध्ये सहकारी, खासगी आणि विदेशी बँकांचा समावेश आहे.