India Coronavirus Updates : देशात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. गेल्या 24 तसात देशभरात 5 हजार 326 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर 453 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोनाबरोबरच ओमायक्रॉनचा धोका देखील वाढतोय. देशात आत्तापर्यंत ओमायक्रॉनचे 200 रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील नागरिकांची चिंता वाढलीय.


देशाची आत्तापर्यंतची स्थिती 
कोरोनाचे संकट आल्यापासून देशात आतापर्यंत एकूण 3 कोटी 47 लाख 52 हजार लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी तब्बल 4 लाख 78 हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. चांगली बाब म्हणजे आतापर्यंत 3 कोटी 41 लाख 71 हजार लोक बरे झाले आहेत. देशात  सध्या कोरोना सक्रिय रुग्णांची संख्या ही 1 लाखांपेक्षा कमी आहे. सध्या 79 हजार 97 लोक हे कोरानाग्रस्त असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.


 





138 कोटी लसीचे डोस 
देशभरात वेगाने लसीकरण करण्यात येत आहे. देशात 20 डिसेंबर 2021 पर्यंत 138 कोटी 34 लाख 78 हजार लसींचे डोस देण्यात आले असल्याची माहिती केंद्रीय आरोगय मंत्रालयाने दिली आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) नुसार, आतापर्यंत सुमारे 66.61 कोटी कोरोना चाचण्या झाल्या आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये 10.14 लाख कोरोना सॅम्पल टेस्ट करण्यात आल्या आहेत. ज्यांचा पॉझिटिव्ह रेट हा 1 टक्क्यांपेक्षा कमी आहे.


कोरोनामुळे देशात मृत्यू होण्याचे प्रमाण हे 1.38 टक्के आहे. तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे 98. 40 टक्के आहे. सक्रिय रुग्णांचे प्रमाण हे  0.23 टक्के आहे. कोरोना अॅक्टिव्ह रुग्णांच्या बाबतीत भारत आता जगात 29 व्या स्थानावर आहे. तर एकूण संक्रमित संख्येमध्ये भारताचा जगात दुसरा क्रमांक आहे. तर कोरोनामुळे झालेल्या मृत्यूचा विचार केला तर, अमेरिका ब्राझीलनंतर भारतात सर्वाधिक मृत्यू  झाले आहेत. महाराष्ट्राचा विचार केला तर कोरोनाबाधितांच्या (Coronavirus) दैनंदिन रुग्णसंख्येत चढ उतार पाहायला मिळत आहे.  राज्यात आतापर्यंत 64 लाख 98  हजार 15 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.71 टक्के आहे. 


महत्त्वाच्या बातम्या: