नवी दिल्ली : जैसलमेर जिल्ह्यातील मोहनगडमध्ये एक विचित्र घटना घडली आहे. जमिन खोदत असताना वाळवंटातून पाण्याचा प्रवाह वाहत होता. हा पाण्याचा प्रवाह इतका मोठा आहे, की पाण्याचा प्रवाह रोखणे आता कठीण होऊ लागले. राजस्थानच्या जैसलमेरच्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केले जात आहेत. या व्हिडिओंमध्ये एक मोठं वाहन जमिनीखालून येणाऱ्या पाण्यामध्ये बुडालेले दिसत आहे आणि आतून पाण्याचा प्रवाह वेगाने वर येताना दिसत आहे.
दावा काय आहे?
पुरातन सरस्वती नदी जैसलमेरच्या मोहनगडमध्ये जिथून पाण्याचा प्रवाह एवढ्या वेगाने वाढत होता, तिथून जात असल्याचा दावा केला जात आहे. त्यामुळे हा प्रवाह दुसरा तिसरा नसून सरस्वती नदी असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
काय आहे सत्य?
सजग टीमने याचा तपास सुरू केला, तेव्हा सोशल मीडियावर त्याची जोरदार चर्चा सुरू असल्याचे दिसून आले. प्रत्येकजण या घटनेबाबत वेगवेगळे दावे करत असल्याचे निदर्शनास आले आणि अनेकांनी वेगवेगळ्या शक्यता व्यक्त केल्या आहेत. पत्रकारांनी देखील काही तर्क वितर्क पटले नसले तरी ते सरस्वती नदीचे पाणी असावे, अशी शक्यता त्यांनी देखील वर्तवली आहे, असे तपासात समोर आले आहे. त्याचबरोबर पत्रिका न्यूजनुसार, केर्न एनर्जीची टीम बाडमेरहून जैसलमेरला येऊन मोहनगड घटनेची चौकशी करणार आहे.
दरम्यान एका हिंदी वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, जैसलमेरमधील मोहनगडचा पाणी मोठ्या प्रमाणावर वाहत असल्याचा व्हायरल झालेला व्हिडिओ 100 टक्के खरा आहे, मात्र सरस्वती नदीच्या पाण्याच्या प्रवाहाबाबत केल्या जाणाऱ्या दाव्यांसाठी अद्याप कोणताही पुरावा समोर आलेला नाही. घटनास्थळी पोहोचलेले भूजल शास्त्रज्ञ एन.डी.इनाखिया यांनी सांगितले की, बोअरवेल खोदत असताना अचानक एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी वाहून गेल्याची घटना सर्वांनाच आश्चर्यचकित करणारी आहे. हा तपासाचा विषय असून त्यावर पुढील माहिती लवकरच समोर येण्याची शक्यता आहे.
नेमकं काय आहे प्रकरण?
जैसलमेर जिल्ह्यातील मोहनगडमध्ये एक विचित्र घटना घडली आहे. जमिन खोदत असताना वाळवंटातून पाण्याचा प्रवाह वाहत होता. हा पाण्याचा प्रवाह इतका मोठा आहे, की पाण्याचा प्रवाह रोखणे आता कठीण होऊ लागले. कूपनलिका खोदण्यासाठी आणलेले बोअरिंग मशिन ट्रकसह जमिनीत गाडले गेले आहे. पाण्याचा वेग पाहून प्रशासनाने 500 मीटर पर्यंतचा परिसर रिकामा केला आहे. दुसरीकडे, ओएनजीसीच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून जमिनीतून बाहेर पडणाऱ्या पाण्याची तपासणी केली. ही घटना शनिवारी पहाटेच्या सुमारास घडली आहे.