India: वेगावर नियंत्रण नसल्याने अपघात, गाडीचा ताबा सुटून दुसऱ्या लाईन मध्ये गेल्याने गाडी पलटली अशा वेगवेगळ्या कारणांमुळे वारंवार होणाऱ्या द्रुतगती महामार्गावरील अपघातांवर नियंत्रण ठेवण्यासाठी रस्ते व वाहतूक मंत्रालयाने मोठा निर्णय घेतलाय. आता नवीन वर्षापासून द्रुतगती मार्गावर या संदर्भात मोठे बदल होणार असून वेग आणि लेनचे उल्लंघन या कारणांचा विचार करून देशातील प्रत्येक expressway वर दर 10 km अंतरावर वेग नियंत्रणाचे बोर्ड, तसेच वाहनांचे लोगो लावले जाणार आहेत. रस्ते वाहतूक मंत्रालयाने द्रुतगती रस्त्यांच्या एजन्सीजला दर दहा किलोमीटर अंतरावर फुटपात वर वाहनांच्या लोगोसह वेग-मर्यादा (Road Signage) नोंदवणे बंधनकारक केलं आहे.


वारंवार होणाऱ्या द्रूतगती महामार्गांवरील अपघातांवर तात्पुरती मलमपट्टी करण्यात आल्यानंतर रस्ते वाहतूक मंत्रालयाला जाग आली आहे.आता नवीन वर्षापासून द्रूतगती मार्गांवर दर 10 किमी अंतरावर वेग मर्यादा चिन्हे आणि वाहनांचे लोगो लावले जाणार आहेत. 


काय होणार बदल? कधीपासून होणार लागू?


राष्ट्रीय महामार्ग मंत्रालयाने  "एक्स्प्रेसवे आणि NHs वरील साइनेज" साठी सर्वसमावेशक मार्गदर्शक तत्त्वे असणारी अधिसूचना जारी केली असून नवीन वर्षात फेब्रुवारी 2025 पासून द्रृतगती महामार्गांवर वेग मर्यादा आणि वाहनांचे लोगो रंगवण्यात येतील. हायवेवर प्रवासी अनेकदा अनिवार्य आणि माहितीपूर्ण चिन्हांकडे दूर्लक्षित करून वेग मर्यादा ओलांडतात, ही बाब लक्षात घेऊन प्रत्येक 5 किमीवर नो पार्किंग चिन्हे आणि आपत्कालिन हेल्पलाईन क्रमांकही लावले जाणार आहेत.


फेब्रुवारी 2025 पासून भारतातील राष्ट्रीय महामार्ग आणि द्रुतगती मार्गांवर अधिक वारंवार दिशादर्शक फलक आणि चिन्हे लावण्यात येणार आहेत. रस्ते सुरक्षा सुधारण्यासाठी करण्यात आलेल्या या बदलांची घोषणा रस्ते वाहतूक मंत्रालयाने केली. वेगमर्यादा आणि लेनचे उल्लंघन हे मोठ्या प्रमाणावर अपघातांचे मुख्य कारण असल्याचे मंत्रालयाने सांगितले.नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार, रस्त्यांवरील वेगमर्यादा आणि वाहनांची चिन्हे दर 10 किलोमीटर अंतरावर पेंट करण्यात येणार आहेत. "दिशादर्शक चिन्हे आणि रस्त्यावरील मार्किंग ही सुरक्षित वाहन चालवण्यासाठी अत्यावश्यक आहेत. रस्त्यांची भाषा म्हणून ती ओळखली जाते आणि प्रत्येक वाहनचालकाला याचे योग्य ज्ञान असणे आवश्यक आहे," असे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.


राज्यात वाढलेल्या अपघातांवर मुख्यमंत्र्यांचे निर्देश


राज्यातील परिवहन क्षेत्राला राज्याला सुरक्षित, सुंदर आणि  शाश्वत ठेवण्यासाठी पुढील 3 वर्षात नवीन ई.व्ही.पॉलिसी घोषित करण्याकरण्याबरोबरच 15 वर्ष झालेली वाहने भंगारात काढावी. रस्ते अपघाताचे (Road Accident) प्रमाण करण्यासाठी ए.आय.चा वापर करून रस्ते सुरक्षा वाढविण्यावर भर देण्यात यावा. यासंदर्भात गुगलशी करार झाला असल्याने त्याचा वापर करावा. त्याचबरोबर घाटात मोठ्या प्रमाणात अपघात होत असल्याने यावर इंजिनियरिंग सोल्यूशन शोधून काढावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आजच्या बैठकीत दिल्या.


हेही वाचा:


AI चा वापर, गुगलशी करार; मुख्यमंत्र्यांसमोर पुढील 100 दिवसांच्या कामाचं प्लॅनिंग, रस्ते सुरक्षेवर भर