Kedarnath Landslide : उत्तराखंडमध्ये (Uttarakhand) मुसळधार पावसामुळे दरड कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. केदारनाथ (Kedarnath) यात्रेचा मुख्य मार्ग असलेल्या गौरीकुंड येथे भूस्खलन झालं आहे. दरड कोसळल्याने येथे 10 ते 12 जण बेपत्ता असल्याची माहिती समोर येत आहे. रुद्रप्रयाग आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहिती नुसार, भूस्खलनात 10 ते 12 लोक गाडले जाण्याची किंवा वाहून गेल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.


उत्तराखंडमध्ये मोठी दुर्घटना, भूस्खलनामुळे 10 हून अधिक लोक बेपत्ता


मुसळधार पावसामुळे उत्तराखंडमध्ये भूस्खलन झालं आहे. उत्तराखंडमधील रुद्रप्रयागमधील (Rudraprayag Landslide) केदारनाथ यात्रेच्या मुख्य थांबा असलेल्या गौरीकुंड येथे दरड कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. ढिगारा खाली कोसळल्याने अनेक दुकाने वाहून गेली. ज्यामध्ये 10-12 लोक वाहून गेल्याची किंवा गाडल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. SDRF कडून या ठिकाणी शोध आणि बचावकार्य राबवण्यात येत असून नागरिकांना शोधण्याचा प्रयत्न सुरु आहे. 






केदारनाथ यात्रेच्या मुख्य मार्गावर दरड कोसळली


ही दुर्घटना गुरुवारी रात्री दीड वाजताच्या सुमारास घडल्याची माहिती समोर आली आहे. गौरीकुंड दात पुलियाजवळ दरड कोसळली आहे. काल रात्री उशिरा दरड कोसळल्याने दोन दुकाने वाहून गेल्याची माहिती आहे. सेक्टर ऑफिसर गौरीकुंड, एनडीआरएफ (NDRF), एसडीआरएफ (SDRF) ही पथकं घटनास्थळी दाखल झाले आहेत. आपत्ती व्यवस्थापन अधिकारी आणि डीडीआरएफ टीम मुख्यालय उपकरणांसह घटनास्थळी रवाना झाली आहे. मुसळधार पाऊस आणि वरून दगड कोसळल्याने शोध आणि बचाव कार्य काही काळ थांबवण्यात आले असून सर्व पथके घटनास्थळी हजर आहेत.


डोंगरावरून दगड तुटून दोन दुकानांवर पडले


केदारनाथ धामचा मुख्य थांबा असलेल्या गौरीकुंड येथील डाकपुलियाजवळ डोंगरावरून दगड तुटून दोन दुकानांवर पडल्याने दुकानांचे नुकसान झालं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 13 जण बेपत्ता असल्याचे सांगण्यात येत आहे. एसडीआरएफचे (SDRF) पथक घटनास्थळी तपासात गुंतले आहे. राज्यातील विविध डोंगराळ भागात गुरुवारी रात्रीपासून पाऊस पडत आहे. पावसामुळे गौरीकुंड येथील डोंगरावरून दगड कोसळून दुकानांवर पडले आहेत.