नवी दिल्ली : बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय रेल्वेमंत्री लालूप्रसाद यादव हे आपल्या खास वक्तृत्त्व शैलीसाठी प्रसिद्ध आहेत. उत्तर प्रदेश निवडणुकीचा निकाल जाहीर होत असताना, लालूप्रसाद यादव यांच्या याच शैलीची झलक पाहायला मिळाली.


बिहारचे माजी उपमुख्यमंत्री आणि भाजपचे वरिष्ठ नेते सुशीलकुमार मोदी यांनी ट्विटरवर लालूप्रसाद यादव यांना मेन्शन करुन प्रश्न विचारला, त्या प्रश्नाला लालूप्रसाद यादव यांनी टोला लगावत आपल्या हटके स्टाईलमध्ये उत्तर दिलं.

सुशीलकुमार मोदी यांनी लालूप्रसाद यादवांना विचारलं, "क्या हाल है ?". लालूप्रसाद यादव यांनी सुशीलकुमार मोदींच्या ट्वीटला कोट करुन उत्तर दिलं, "ठीक बा। देखा ना, बीजेपी ने तुम्हें यूपी में नहीं घुसने दिया तो फायदा हुआ।"



ट्विटरवर सध्या सुशीलकुमार मोदी यांचं लालूप्रसाद यादव यांना मेन्शन करुन केलेलं ट्वीट आणि त्याला लालूप्रसाद यादव यांनी दिलेलं उत्तर मोठ्या प्रमाणात रिट्विट होतं आहे.

https://twitter.com/laluprasadrjd/status/840437698233946113