प्रयागराज : सध्या उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे महाकुंभमेळा चालू आहे. या महाकुंभमेळ्यात देशातील कानाकोपऱ्यातून भाविक त्रिवेणीसंमगावर पवित्र स्नान करण्यासाठी येत आहेत. यासह या कुंभमेळ्यात स्नानासाठी येणारे साधू सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहेत. काही दिवसांवूर्वी एका सुंदर तरुणीने अध्यात्माकडे जात असल्याचे सांगत होते. याच महाकुंभमेळ्यात डोक्यावर एक पक्षी असलेला साधू सगळ्यांचे लक्ष वेधून घेत होता. असे असतानाच चक्क आयआयटीचे शिक्षण घेतलेला साधू समोर आला आहे. या उच्चशिक्षित साधूची सध्या जगभरात चर्चा आहे. 


आयआयटी बॉम्बेमधून इंजिनिअरिंगचे शिक्षण


सध्या चर्चेत आलेले हे तरुण साधू उच्चशिक्षित आहेत. त्यांनी आयआयटी बॉम्बेमधून एअरोस्पेस इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतलेले आहे. सोबतच फोटोग्राफीची आवड असल्यामुळे त्यांनी व्ह्युज्यूअल कम्यूनिकेशनचेही शिक्षण घेतलेले आहे. मात्र कशातही शांती, सुख, समाधान न मिळाल्याने शेवटी या तरुणाने साधू होण्याचा निर्णय घेतला. या तरुण साधूने स्वत:च त्याची ही कहाणी सांगितली आहे. 


मी हसत हसत मरणार 


एका माध्यमाशी बोलताना त्यांनी आपली साधू होण्याची कहाणी सांगितली आहे. "मला तर खूप सारी नावं मिळाली आहेत. राघव, माधव, मशानी गोरख, बटुक भैरव अशी खूप सारी नावे मिळाली आहेत. जगात कधीही अंत होऊ शकतो. मी हसत हसत मरणार आहे. मृत्यू कधीही येऊ शकतो. मी जर हसत नसेल आणि माझा अंत जवळ आला तर मी काय देवाला थांबा थांब म्हणू का," असे या साधुने सांगितले.


थ्री इडियट्सप्रमाणे आर्ट्समध्ये


मी आयआयटी बॉम्बे येथून शिकलेलो आहे. मी एअरोस्पेस इंजिनिअरिंग केलेले आहे. माझी ही अवस्था सर्वात चांगली अवस्था आहे. तुम्ही ज्ञानाच्या शोधात चालत राहिलात तर शेवटी इथेच याल. माझा जन्म हरियाणात झालेला आहे. मी चार वर्षे आयआयटी मुंबईत होतो. मी फोटोग्राफी शिकलो. थ्री इडियट्सप्रमाणे आर्ट्समध्ये गेलो. मी एक वर्ष फिजिक्स शिकवलेलं आहे. मला फोटोग्राफीमध्ये काम करायचे होते. पदवी अशल्याशिवाय मला कोणी काम देत नव्हते. त्यानंतर मी मास्टर्स इन डिझाईन ही पदवी घेण्यासाठी प्रवेश परीक्षा उत्तीर्ण झालो. त्यानंतर फोटोग्राफी शिकलो, असं या तरुण साधून सांगितले.


मी ट्रॅव्हल फोटोग्राफर होतो


मी आयुष्य म्हणजे काय हे समजून घेत होतो. सुरुवातीला मला पॅशन म्हणजे आयुष्य वाटले. त्यानंतर मग मी फोटोग्राफी करण्याचे ठरवले. ड्रीम लाईफ जगण्यासाठी माझी धडपड चालू होती. पैसे येतील, मजा करेन, असा माझा विचार होता. मी ट्रॅव्हल फोटोग्राफर होतो. मी दीड महिने काशीत राहिलो. त्यानंतर आता मी कुंभमेळ्यात आलो," अशीही माहिती या तरुण साधून दिली. 


मला साधं जेवण बनता येत नव्हतं


हा तरुण साधू तीन ते चार महिने ऋषिकेशमध्ये होता. त्यानंतर त्यांनी पदयात्रा केली होती. ते रोज 20 किलोमिटर करायचे. चारधाम यात्रा करून आता ते कुंभमेळ्यात आले आहेत. आयआयटीमध्ये शिक्षण घेतलं मला काही मिळालं नाही, नंतर फोटोग्राफी केली मला समाधान मिळालं नाही, नंतर मी का फिरतोय हा प्रश्न मला पडला. मला काहीच माहिती नाही, असं मला समजलं नाही. नंतर मी धर्मशाळेत गेलो. तिथे मी खूप काही शिकलो. मला साधं जेवण बनता येत नव्हतं. मला फार आश्चर्य वाटलं. नंतर मग मी रोजच्या जगण्यातली कामं शिकू लागलो, असं या साधून सांगितलं. एवढा उच्चशिक्षित असताना हा तरुण साधू झाल्यामुळे सगळीकडे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. 


पाहा व्हिडीओ :



हेही वाचा :


त्या सुंदर साध्वीचं एका रात्रीत नशीब पालटलं, भारतभरात फेमस, इन्स्टाग्रामवर काही तासांत 1 मिलियन फॉलोवर्स!