लखनऊ : सुनेचे अनैतिक संबंध असल्याचं उघड झाल्यामुळे तिच्या सासऱ्यांनी गोळ्या झाडून सून आणि तिच्या प्रियकराची हत्या केली आहे. उत्तर प्रदेशच्या सीतापूरमध्ये हे दुहेरी हत्याकांड उघडकीस आलं.

 
सीतापूरच्या मुडिया कैल गावातील बृज कुमार यांनी त्यांच्या 28 वर्षीय सुनेला प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत पाहिलं. त्यामुळे रागाचा पारा चढलेल्या बृज कुमार यांनी सुनेसह 32 वर्षीय प्रियकर राकेश राठोडची हत्या केली.

 
बृज कुमार यांनी त्यांच्या परवाना असलेल्या बंदुकीतून दोघांवर गोळ्या झाडल्या. यात दोघांचाही मृत्यू झाला असून पोलिस अधिक तपास करत आहेत.