नवी दिल्ली : भिडे गुरुजी वडीलधारे आहेत. त्यांच्याबद्दल आदर आहे आणि आदर राहाणार. त्यांनी लहान मुलांचं संघटन केलं. त्यांचा काय संबंध पण नाही, त्यांच्याविरोधात बोलणाऱ्यांची लायकी नाही," असं विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज उदयन राजे भोसले यांनी केलं आहे. ते दिल्लीत एबीपी माझाशी बोलत होते.


कोरेगाव भीमा दगडफेकी प्रकरणी भिडे गुरुजी आणि मिलिंद एकबोटे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भिडे गुरुजी दगडफेकीची सूत्रधार असल्याचा आरोप भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. तसंच या घटनेमागे काही हिंदुत्त्ववादी संघटना असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही केला आहे.

प्रकाश आंबेडकरांच्या आरोपांवर भिडे गुरुजींचं स्पष्टीकरण

परंतु उदयन राजे यांनी भिडे गुरुजींची पाठराखण करत शरद पवार यांना घरचा आहेर दिला आहे.

भिडे गुरुजी एक नबंर माणूस!
उदयनराजे म्हणाले की, "भिडे गुरुजी आज मॅथेमॅटिक्समध्ये पीएचडी केलेला, एक नंबर माणूस आहे. हे जर आम्हाला प्रोफेसर असते, त्यांनी आम्हाला प्रश्न-उत्तर दिले असते तर मी कधी आयुष्यात पासही झालो नसतो. ग्रेट माणूस आहे. त्याच्यावर अॅट्रॉसिटी लावता, थोडा तरी विचार करायला हवा."

कोरेगाव-भीमामध्ये मृत्यू झालेल्या तरुणाच्या कुटुंबाकडून शांततेचं आवाहन

भिडे गुरुजी रडले, माझा काही संबंध नाही म्हणाले
कोरेगाव भिमा वाद झाल्यानंतर भिडे गुरुजींशी काय बोलणं झालं, चर्चा झाली? या प्रश्नावर उदयनराजे म्हणाले की, "रडले, ते म्हणाले माझा काही संबंध नाही. त्यांना रडू नका म्हणालो. ते बोलले महाराज, उभ्या आयुष्यात राहिले किती वर्ष, माझं कधीही काही होऊ शकतं. मी फक्त लोकांना प्रोत्साहन दिलं, हे केलं, ते केलं. मिलिंद एकबोटे सुद्धा माझा मित्र आहे. त्यांना मी मनापासून सांगितलं, कारण नसताना उद्रेक तिथे होईल, असं वक्तव्य करु नका.

कोरेगाव भीमातील हिंसाचार सरकारच्या हलगर्जीमुळे : ग्रामस्थ

जितेंद्र मित्र आहे, हॅण्डसम आहे, पण...
कोरेगाव भीमा घटनेला हिंदुत्त्ववादी संघटना असल्याचा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे, याबाबत विचारलं असता, उदयन राजे म्हणाले की, जितेंद्र माझा मित्र आहे. आमदार आहे. हॅण्डसम आहे. पण त्याने थोडा विचार करायला हवा होता, काय बोलतो, कोणाशी बोलतो आणि कशासाठी बोलतो. इफ अँड बट ऑलवेज देअर.

पाहा संपूर्ण व्हिडीओ



संबंधित बातम्या

थर्टी फर्स्ट ते महाराष्ट्र बंद, पोलीस ऑन ड्युटी 72 तास

भिडे गुरुजींवरील गुन्हा मागे घ्या, सांगलीत समर्थनार्थ मोर्चा

दलित तरुणांची धरपकड तात्काळ थांबवावी : प्रकाश आंबेडकर

दलित समाज धाकटा भाऊ, सर्वांना एकत्र नांदायचं आहे : छत्रपती संभाजीराजे

सणसवाडी दगडफेकीच्या निषेधार्थ आज महाराष्ट्र बंद

पुण्यातील सणसवाडीत दोन गटात वाद, परिस्थिती नियंत्रणात

सणसवाडी दगडफेकीची न्यायालयीन चौकशी होणार : मुख्यमंत्री

सरकारने पुरेशी खबरदारी घ्यायला हवी होती : शरद पवार


वढूमध्ये दोन्ही गटांच्या प्रतिनिधींची बैठक, अॅट्रॉसिटीचे गुन्हे मागे घेण्याची तयारी


भीमा कोरेगावप्रकरणी छत्रपती संभाजीराजे यांचं राज्यसभेत निवेदन