शुभभ्रता मुझुमदार असं मुलाचं नाव असून कोलकात्यातील जेम्स लाँग सरनी भागात त्याचं घर आहे.
आरोपीच्या आई बिना मुझुमदार यांचा 80 व्या वर्षी वृद्धापकाळाने मृत्यू झाला. तीन वर्षांपूर्वी म्हणजे 7 एप्रिल 2015 रोजी आईने अखेरचा श्वास घेतला होता. मात्र आईच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार न करता त्याने तेव्हापासून मृतदेह डीप फ्रीजमध्ये जतन करुन ठेवला आहे.
शुभभ्रता लेदर टेक्नॉलॉजीमध्ये पारंगत असून त्याने केमिकल्सच्या मदतीने आईच्या मृतदेहाचं जतन केलं.
इतकंच नाही, तर 90 वर्षीय वडिलांचा मृत्यू झाला तर त्यांच्यासाठीही शुभभ्रताने दुसरा फ्रीज घरात आधीच आणून ठेवला आहे. तब्बल तीन वर्ष याची कुणकुण कोणालाच कशी लागली नाही? याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे.
कोलकाता पोलिसांनी शुभभ्रता मजुमदारला ताब्यात घेऊन चौकशी सुरु केली आहे. त्याच्या घरातही अनेक रसायनांच्या बाटल्या सापडल्याचं पोलिसांनी सांगितलं.