कलम 51 अर्थात वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत सलमानला दोषी धरण्यात आलं असून, त्याला 5 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. शिक्षेनंतर सलमानला सेंट्रल जेलमध्ये नेण्यात आलं. कोर्ट ते जेल या प्रवासादरम्यान पोलिसांनी रस्ता रिकामा केला होता. रस्त्याच्या दोन्ही बाजूला लोकांची मोठी गर्दी होती.
सलमानला आजची रात्र तुरुंगातच काढावी लागणार आहे. कारण त्याच्या जामीन अर्जावर सुनावणी करण्यास जिल्हा सत्र न्यायालयाने नकार दिला आहे. त्याच्या जामीन अर्जावर शुक्रवारी सकाळी 10.30 वा. सुनावणी होणार आहे.
दरम्यान, सलमानला शिक्षा सुनावताच, या प्रकरणाचा पाठपुरावा करणाऱ्या बिष्णोई समाजाने एकच जल्लोष केला.
सलमानच्या बहिणींना रडू कोसळलं
दरम्यान, कोर्टाने शिक्षा सुनावताच कोर्टरुममध्ये उपस्थित असलेल्या सलमानच्या बहिणी अर्पिता आणि अल्विरा या दोघींनाही रडू कोसळलं.
...तर सलमान आणि आसाराम बापू एकाच बराकमध्ये!
महत्त्वाचं म्हणजे जामीन न मिळाल्यास सलमानला सेंट्रल जेलच्या बराक क्रमांक दोनमध्ये ठेवलं जाऊ शकतं. याच बराकमध्ये मुलींच्या लैंगिक शोषणाप्रकरणी तुरुंगवास भोगत असलेला आसाराम बापूही कैद आहे.
मागच्यावेळी शिक्षेनंतर सलमानला याच तुरुंगाच्या बराक क्रमांक एकमध्ये ठेवण्यात आलं होतं. तो सात दिवस या तुरुंगात कैद होता. त्याची ओळख कैदी नंबर 343 अशी होती.
काळवीट शिकार
कांकाणी गावात दोन काळवीट शिकार केल्याचं हे प्रकरण आहे. सलमानने 1998 मध्ये एक आणि दोन ऑक्टोबरच्या रात्री विविध ठिकाणी काळवीटाची शिकार केल्याचा आरोप आहे.
गोळीचा आवाज ऐकून ग्रामस्थ घटनास्थळी आले. तेव्हा सलमानने इतर कलाकारांसोबत गाडीतून पळ काढला, तर दोन्ही हरणांचे मृतदेह तिथेच पडून होते. याप्रकरणी सलमान दोषी ठरला आहे.
दरम्यान, कोर्टानं शिक्षा सुनावण्याआधी जेव्हा सलमान आणि इतर आरोपींना आपलं म्हणणं मांडण्याची संधी दिली, तेव्हा सर्वांनीच आपल्यावरचे आरोप नाकारले होते.
आपण काळविटाची शिकार केली नाही, त्यात आपला कुठलाही हात नाही, असं म्हटलं होतं.
मात्र कोर्टानं त्यानंतर सलमान खानला दोषी ठरवत असल्याचं जाहीर केलं. तर इतर आरोपींना केवळ पुराव्याअभावी निर्दोष सोडलं.
निर्दोष अभिनेत्यांच्या निकालाला आव्हान
दरम्यान, कोर्टाने ज्या अभिनेत्यांना निर्दोष ठरवलं आहे, त्याला विश्नोई समाज वरच्या कोर्टात आव्हान देणार आहे. जोधपूर कोर्टाने सैफ अली,तब्बू, नीलम आणि सोनाली बेंद्रे यांना निर्दोष ठरवलं आहे.
LIVE UPDATE
- जोधपूर तुरुंगाबाहेरच्या हालचाली वाढल्या, पोलिसांचा मोठा बंदोबस्त
- सलमान खानला आजची रात्र तुरुंगातच घालवावी लागू शकते
- सलमान खानला 5 वर्षांची शिक्षा
- काळवीट शिकार प्रकरण - न्यायाधीश पुन्हा कोर्टरुममध्ये पोहोचले, सलमान खानला दुपारी 2 वा शिक्षा सुनावणार
- काळवीट शिकार प्रकरण - सलमान खान दोषी, सैफ अली खान, सोनाली बेंद्रे, नीलम आणि तब्बू निर्दोष
- सलमानला 1 ते 3 वर्षांची शिक्षा झाल्यास आजच जामीन मिळणं शक्य
- त्यापेक्षा जास्त शिक्षा झाल्यास जेलमध्ये रवानगीची शक्यता
- सलमान खानला 1 ते 6 वर्षांची शिक्षा होण्याची शक्यता होण्याची शक्यता.
सेलिब्रिटी जोधपूरमध्ये
या प्रकरणाच्या सुनावणीसाठी अभिनेता सलमान खान, सैफ अली खान, सोनाली बेंद्रे आणि तब्बू जोधपूरमध्ये दाखल झाले.
जोधपूर न्यायालयाचे पिठासीन अधिकारी देवकुमार खत्री यांनी 20 वर्ष जुन्या खटल्याच्या निर्णयासाठी आजची तारीख निश्चित केली आहे.
वीस वर्षांपूर्वी म्हणजे 1998 मध्ये 'हम साथ साथ है' चित्रपटाचं चित्रीकरण जोधपूरमध्ये सुरु होतं. त्यावेळी सलमानने घोडा फार्म हाऊस आणि भवाद गावात 27-28 डिसेंबरच्या रात्री हरणांची, तर कांकाणी गावात 1 ऑक्टोबरला काळवीटाची शिकार केल्याचा आरोप आहे.
नेमकं प्रकरण काय आहे?
काळवीट शिकार प्रकरण 27 आणि 28 सप्टेंबर 1998 सालचं आहे. सलमान खान दिग्दर्शक सुरज बडजात्या यांच्यासोबत 'हम साथ साथ है' या सिनेमाची शुटिंग जोधपूरमध्ये करत होता. यावेळी 27 सप्टेंबरच्या रात्री तो सहकलाकार सैफअली खान, सोनाली बेंद्रे, तब्बू आणि नीलम यांच्यासोबत शिकारीसाठी निघाला.
यावेळी सलमानने संरक्षित वन्य जीवांच्या यादीत असलेल्या दोन काळवीटांची शिकार केल्याचा आरोप आहे. याशिवाय विविध दोन ठिकाणी काळवीटाची शिकार केल्याचाही त्याच्यावर आरोप करण्यात आला. त्यामुळे त्याच्यावर एकूण चार खटले दाखल आहेत.
कोणकोणत्या केस दाखल
1. कांकाणी गाव केस - 5 एप्रिलला फैसला होणार. गोळीचा आवाज ऐकून ग्रामस्थ घटनास्थळी आले. तेव्हा सलमानने इतर कलाकारांसोबत गाडीतून पळ काढला, तर दोन्ही हरणांचे मृतदेह तिथेच पडून होते.
2. घोडा फार्म हाऊस केस - 10 एप्रिल 2006 रोजी सीजेएम कोर्टाने पाच वर्षांची शिक्षा सुनावली. सलमान हायकोर्टात गेला. 25 जुलै 2016 रोजी त्याची सुटका करण्यात आली. राज्य सरकारने या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात दाद मागितली.
3. भवाद गाव केस - सीजेएम कोर्टाने 17 फेब्रुवारी 2006 रोजी सलमानला दोषी ठरवून एका वर्षाची सुनावली. हायकोर्टाने या प्रकरणातही सलमानची मुक्तता केली. राज्य सरकारने या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात दाद मागितली.
4. शस्त्रास्त्र केस - 18 जानेवारी 2017 रोजी कोर्टाने सलमानची सुटका केली. राज्य सरकारने या निर्णयाविरोधात हायकोर्टात दाद मागितली.
सलमान खानविरोधात वन्यजीव संरक्षण कायदा, कलम 51 आणि अन्य कलाकारांविरोधात वन्यजीव संरक्षण कायदा, कलम 51 आणि भारतीय दंड विधान कलम 149 अंतर्गत बेकायदेशीरपणे एका जागी जमण्याचा गुन्हा दाखल आहे.
सलमान खान अवैध शस्त्र खटल्यातूनही सुटला!
अभिनेता सलमान खानला जोधपूर कोर्टाने या वर्षाच्या सुरुवातीला 17 जानेवारीला मोठा दिलासा दिला. अवैध शस्त्र बाळगल्याप्रकरणाच्या खटल्यातून सलमान खान सुटला.
काळवीट शिकार केसमध्ये अवैध शस्त्रास्त्र बाळगल्याप्रकरणी सलमानविरोधात जोधपूर न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणी झाली. या खटल्यात सलमानला संशयाचा फायदा मिळाला. त्यामुळे सलमान निर्दोष सुटला.
सरकारी वकिलांचा युक्तिवाद काय?
त्या रात्री सर्व कलाकार जिप्सी कारमध्ये होते, असा दावा सराकरी वकील भवानी सिंह भाटी यांचा आहे, तर सलमान खान जिप्सी चालवत असल्याचंही त्यांचं म्हणणं आहे. काळवीट पाहताच त्याने गोळी चालवली आणि यामध्ये दोन काळवीटांचा मृत्यू झाला. लोकांनी जेव्हा हा सर्व प्रकार पाहिला तेव्हा या कलाकारांचा पाठलाग केला, मात्र सर्व जण मृत काळवीटांना सोडून पळून गेले, असा दावा सरकारी वकिलांनी केला आहे.
सलमानच्या वकिलांचा दावा
फिर्यादींच्या दाव्यात अनेक प्रकारच्या उणिवा असून काळवीटाचा मृत्यू गोळी मारल्यानेच झाला होता का, हे अजून फिर्यादींनी सिद्ध केलेलं नाही, असं सलमानचे वकील एच. एम. सारस्वत यांचं म्हणणं आहे. काळवीटांचा मृत्यू गोळी मारल्यानेच झाला होता का, हा प्रश्न आहे आणि अशा प्रकारच्या तपासावर विश्वास ठेवला जाऊ शकत नाही, असा प्रतिदावा सलमानच्या वकिलांनी केला. या प्रकरणात दुष्यंत सिंह आणि दिनेश सिंह हे आणखी दोन आरोपी आहेत. काळवीटांची शिकार करताना दुष्यंत सिंह सलमानच्यासोबत होता, असं बोललं जातं, तर दिनेश सिंह हा सलमानचा सहाय्यक असल्याचं बोललं जातं.
खटला कुणी दाखल केला?
सलमान खानसह सैफअली खान, सोनाली बेंद्रे, तब्बू आणि नीलम यांच्याविरोधात बिष्णोई समाजातील लोकांनी पोलिसात गुन्हा दाखल केला. त्यावेळी सलमानवर तीन गुन्हे दाखल करण्यात आले होते. मात्र अटक करताना पोलिसांनी सलमानच्या रुममध्ये दोन रायफल मिळाल्या, ज्यांचा परवाना संपलेला होता. त्यानंतर त्याच्याविरोधात शस्त्रास्त्र कायद्यानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला.
किती वर्षांची शिक्षा?
वन्य जीवन अधिनियमाच्या कलम 149 अंतर्गत काळवीट शिकारीसाठी सात वर्षांपेक्षा जास्त कारावासाच्या शिक्षेची तरतूद आहे. काही वर्षांपूर्वी ही शिक्षा सहा वर्षांपर्यंत होती. सलमानचं प्रकरण 20 वर्ष जुनं आहे. अशा स्थितीत सहा वर्षांपर्यंत कारावासाची शिक्षा शक्य आहे. हे कलम सह आरोपींवरही लागू होणार.
कतरिना सिद्धिविनायकाच्या दर्शनाला
दरम्यान, काळवीट शिकारप्रकरणातून सलमान खानची सुखरुप सुटका व्हावी, यासाठी त्याची जवळची मैत्रीण अभिनेत्री कतरिना कैफने मुंबईच्या सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं . यावेळी तिच्यासोबत सलमानची बहीण अर्पिता सुद्धा होती. दोघींनी मध्यरात्री 12 वाजता मुंबईतील प्रसिद्ध अशा सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले.
संबंधित बातम्या
काळवीट शिकार : सलमानसह इतर कलाकार जोधपुरात दाखल
काळवीट शिकार प्रकरणी सलमानचा फैसला 5 एप्रिलला
काळवीट शिकारप्रकरण, सैफ, तब्बू, सोनाली यांची जोधपूर न्यायालयात हजेरी