कोची : पाचशे-हजारच्या नोटा चलनातून बाद केल्यानंतर शंभर, पन्नास सारख्या सुट्या पैशांचा तुटवडा जाणवत आहे. यावेळी कोचीच्या एका चर्चने आपली तिजोरी सर्वसामान्यांसाठी खुली केली आहे. एर्नाकुलममधील सेंट मार्टीन पोरेस चर्चनं हा दिलदारपणा दाखवला आहे.


कोचीच्या एर्नाकुलममधील नागरिकांनाही कमी रकमेच्या नोटांअभावी त्रास जाणवत आहे. त्यामुळे सेंट मार्टिन चर्चने यासंदर्भात एक बैठक बोलावली. या बैठकीत चर्चची तिजोरी गरजूंसाठी खुली करण्याचा निर्णय घेण्यात आला.

चर्चमध्ये ही तिजोरी ठेवण्यात आली असून ज्याला जितके पैसे गरजेचे आहे, त्याला तितके पैसे दिले जात आहेत. स्वतःजवळ पैसे आल्यानंतर ते चर्चच्या तिजोरीत स्वतःहून जमा करण्याचं आवाहनही चर्चनं यावेळी केलं आहे.