मुंबई: राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीबाबत सर्व अंदाज चुकीचे ठरवत मोदी-शाह यांनी पुन्हा एकदा सर्वांना आश्चर्याचा धक्का देत बिहारचे राज्यपाल रामनाथ कोविंद यांच्या नावाची घोषणा केली.
आतापर्यंत चर्चेतही नसलेलं नाव जाहीर करत मोदी आणि शाह यांनी विरोधकांनाही धक्का दिला आहे. दरम्यान, एनडीएचं सध्याचं संख्याबळ पाहता रामनाथ कोविंद हे राष्ट्रपतीपदी विराजमान होणं जवळजवळ निश्चित आहे.
रामनाथ गोविंद यांच्याविषयी 10 खास गोष्टी :
1. सध्या बिहारचे राज्यपाल
2. भाजपमध्ये दलित समाजचं प्रतिनिधित्व करणारं मोठं नाव
3. दोन वेळेस राज्यसभेचे खासदार
4. उत्तरप्रदेशच्या कानपूरचे रहिवाशी
5. भाजपच्या दलित मोर्च्याचे अध्यक्षही होते.
6. ऑल इंडिया कोली समाजाचे अध्यक्ष होते.
7. भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ताही होते.
8. पेशानं वकिल
9. 2002 मध्ये संयुक्त राष्ट्रात भारताचं प्रतिनिधित्व केलं होतं.
10. गृह मंत्रालयासह अनेक मंत्रालयाचे सदस्य होते.
संबंधित बातम्या: