नवी दिल्ली : इतर देशांच्या तुलनेत भारतीयांचा अत्यंत कमी पैसा स्विस बँकेत असल्याचा दावा स्वित्झर्ल्डंमधल्या प्रायव्हेट बँकरर्सच्या एका ग्रुपनं केला आहे. भारतातला बहुतांश काळा पैसा हा स्विस बँकेत जमा असल्याचा दावा केला जातो. पण त्या दाव्याला या ग्रुपनं फेटाळून लावलं आहे.
भारतापेक्षा स्विस बँकेत सिंगापूर आणि हाँगकाँगसारख्या देशांचा पैसा अधिक आहे. नुकत्याच प्रसिद्ध करण्यात आलेल्या आकड्यांनुसार, भारतीयांचे जवळपास 8 हजार 392 कोटी रुपये असल्याचं कळतं आहे. अर्थात या बँकेत इतर देशांचा किती पैसा आहे, याची आकडेवारी मात्र मिळालेला नाही.
काही दिवसांपूर्वीच स्वित्झर्ल्डनं आपल्या बँकेत जमा असलेल्या पैशांची माहिती त्या त्या देशांना देण्याचा करार केला आहे. यामध्ये भारतासह तब्बल 40 देशांचा समावेश आहे. त्याच अंतर्गत ही माहिती जारी करण्यात आली आहे.
असोसिएशनचे प्रबंधक जॉन लांगलो यांनी सांगितलं की, स्वित्झरलँडमध्ये सिंगापूर आणि हाँगकाँगच्या तुलनेत भारतीयांची कमी खाती आहेत. तसेच त्यांच्यासाठी स्वित्झरलँडपेक्षा अशियाई वित्तीय केंद्रात खाती उघडणं जास्त व्यवहारिक असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.