SBI : ब्लॉक झालेलं ATM पुन्हा कसं सुरु करावं?
एबीपी माझा वेब टीम | 19 Oct 2016 03:03 PM (IST)
मुंबई : स्टेट बँक ऑफ इंडियाच्या जवळपास सहा लाख ग्राहकांची डेबिट कार्ड्स ब्लॉक करण्यात आली आहेत. एसबीआयच्या सिस्टीममध्ये सुरक्षेशी निगडीत बग शिरण्याच्या भीतीमुळे प्रतिबंधात्मक उपाय म्हणून बँकेतर्फे ही पावलं उचलण्यात आली आहेत. कोणतीही पूर्वसुचना दिल्याशिवाय कार्ड ब्लॉक केल्याने ग्राहकांमध्ये संभ्रम आहे. मात्र ब्लॉक झालेल्या कार्डसाठी पुन्हा अर्ज करता येऊ शकतो. असा करा अर्ज एटीएम कार्ड ब्लॉक केल्यानंतर एसबीआयकडून ग्राहकांना नवीन कार्ड देण्यात येणार आहेत. यासाठी ग्राहकांना आपल्या बँक शाखेत जाऊन अर्ज करावा लागणार आहे.