शेतकऱ्यांच्या मागण्या
- शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी वेगळे अधिवेशन बोलवा
- स्वामीनाथन आयोग लागू करावा
- शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी
- शेतमालाला दीडपट हमीभावा द्यावा
या आंदोलनात एक लाखाहून अधिक शेतकरी सहभागी झाले असल्याचा दावा आयोजकांनी केला आहे. शेतकऱ्यांच्या या मोर्चासाठी चोख पोलीस बंदोबस्त करण्यात आला आहे. लाँग मार्चच्या संपूर्ण परिसरात तब्बल 3500 पोलीस तैनात करण्यात आले आहेत.
रामलीला मैदानात दाखल झालेल्या शेतकऱ्यांनी ‘अयोध्या नहीं, कर्ज माफी चाहिए’ अशा घोषणा देत दिल्ली हादरवून सोडली. या मोर्चात शेतकऱ्यांसह डॉक्टर, वकील, माजी सैनिक आणि विद्यार्थ्यांनी सहभाग घेत मोर्चाला पाठिंबा दर्शवला आहे.
दरम्यान काल किसान संघर्ष समितीचे व्ही. एम सिंह, योगेंद्र यादव, सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर, अशोक ढवळे, ज्येष्ठ पत्रकार पी साईनाथ यांनी एकत्रित पत्रकार परिषदेत या आंदोलनाची माहिती दिली. देशाच्या वेगवेगळ्या भागातून शेतकरी राजधानी दिल्लीमध्ये एकवटले आहेत. संध्याकाळी रामलीला मैदानावर 'एक शाम किसान के नाम' या कार्यक्रमासाठी सगळे एकत्रित जमले होते.
वाचा : देशभरातील 200 शेतकरी संघटनांचा मोर्चा दिल्लीत धडकला