व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये कुमारस्वामी फोनवर कोणाला तरी सांगत आहेत की, "मारताना कोणत्याही गोष्टीची तमा बाळगू नका." परंतु यानंतर हे प्रकरण अंगाशी येईल असे लक्षात आल्यानंतर कुमारस्वामी यांनी मी असा कोणताही आदेश दिला नसल्याची प्रतिक्रिया देत सारवासारव केली.
सोमवारी कर्नाटकमधील जेडीएसचे नेते नेते प्रकाश (50) यांची हत्या करण्यात आली. प्रकाश हे त्यांच्या कारने मद्दूरला जात असताना त्यांच्यावर हल्ला झाला. चार दुचाकीस्वारांनी त्यांच्यावर गोळीबार केला. या हल्ल्यात जबर जखमी झालेल्या प्रकाश यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात त्यांना मृत घोषित करण्यात आले.
प्रकाश यांच्या हत्येची माहिती मिळताच कुमारस्वामी खूप रागावले होते. तेव्हा ''प्रकाश चांगला माणूस होता. प्रकाशला मारणाऱ्या नराधमांना कोणतीही तमा न बाळगता ठार मारा. काहीही प्रॉब्लेम नाही. असे आदेश कुमारस्वामी फोनवर कोणालातरी देत असल्याचे व्हिडीओमध्ये पहायला मिळत आहे.