तिरुअनंतपुरम : हौसेला मोल नाही असं म्हटलं जातं. हौस असेल तर माणूस काहीही करु शकतो. असाच एक चहाचे दुकान असलेला केरळमधील अवलिया ज्यांने त्याच्या बायकोसोबत जगभरातल्या 26 देशांचा प्रवास केला आहे, त्याचे निधन झालं आहे. केआर उर्फ बालाजी असं या व्यक्तीचं नाव असून त्यांच्या जीवनाचा प्रवास 71 व्या वर्षी संपला. 


केआर विजयन उर्फ बालाजी यांचे कोच्चीमधील गांधीनगर या ठिकाणी चहाचे दुकान (Kerala Tea Seller) आहे. केवळ चहाच्या दुकानातील मिळणाऱ्या उत्पन्नावर विजयन यांनी त्यांची पत्नी मोहना यांच्यासोबत अमेरिका, स्वित्झर्लंड, ब्राझील, अर्जेंटिना, पेरु आणि इतर 26 देशांचा प्रवास केला आहे. त्यांनी सप्टेंपबर महिन्यात रशिया या देशाला भेट दिली होती. हा त्यांचा अखेरचा आंतरराष्ट्रीय प्रवास ठरला आहे. 


 






केआर विजयन यांचे केरळमधील गांधीनगर या ठिकाणी 'श्री बालाजी कॉफी हाऊस' या नावाचं एक साधं चहा आणि कॉफीचं दुकान आहे. 1988 साली त्यांनी हिमालयाचा प्रवास केला होता आणि त्यानंतर अनेक राज्यांना भेटी दिल्या होत्या. या जोडप्याने 2007 साली पहिल्यांदा इजिप्त या देशाला भेट दिली आणि त्यानंतर आतापर्यंत 26 देशांचा प्रवास केला. 


या जोडप्याच्या जगभ्रमतीने ज्यांना प्रवासाची आवड आहे अशा लोकांना प्रोत्साहित केलं आहे. गेल्या 16 वर्षात या जोडप्याने 26 देशांचा प्रवास केला आहे, तेही केवळ चहाच्या दुकानातून मिळणाऱ्या उत्पन्नावर. 


महत्त्वाच्या बातम्या :