Corona vaccination Rajesh Tope meet Indurakar Maharaj : काही दिवसांपूर्वी इंदुरीकर महाराज यांनी कोरोन लस घेणार नसल्याचे वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्यावरून राज्यात उलटसुलट चर्चाही सुरू झाल्या होत्या. राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे इंदुरीकर महाराज यांची भेट घेणार असून लशीबाबत त्यांचे प्रबोधन करणार आहेत. इंदुरीकर महाराजांचे आज जालन्यात किर्तन आयोजित करण्यात आले आहे. त्याआधी राजेश टोपे त्यांची भेट घेणार आहेत. 


काही दिवसांपूर्वी एका किर्तनादरम्यान कोरोना प्रतिबंधक लशीबाबत इंदुरीकर महाराज यांनी नकारात्मक विधान केले होते. त्यांच्या या वक्तव्यावर अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर आता इंदुरीकर महाराज जालन्यामध्ये येणार आहेत. यावेळी आरोग्य मंत्री राजेश टोपे त्यांची भेट घेणार आहेत. अधिकाधिक लोकांनी कोरोना लसीकरण करावे यासाठी त्यांनी आवाहन करावे यासाठीही राजेश टोपे आवाहन करणार आहेत. 


सलमान खानच्या व्हिडिओवर आरोग्य मंत्र्याचे स्पष्टीकरण


कोरोना लसीकरणात वाढ व्हावी यासाठी बॉलिवूड अभिनेता सलमान खान यांनी आवाहन करावे असे आरोग्य मंत्र्यांनी म्हटले होते. त्यानंतर सलमान खानने एक व्हिडिओ प्रसिद्ध करून लसीकरणासाठी आवाहन केले. मात्र, भाजपने या व्हिडिओवर आक्षेप घेतला होता. विशिष्ट समाजाचे तुष्टीकरण सुरू असल्याचा आरोप भाजपने केला होता. त्यावर आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. सलमान खान हे मोठे सेलिब्रेटी असून ते एका विशिष्ट समाजाचे नाहीत. सलमान खान हे मुस्लिम समाजातून येत असल्याने तुष्टीकरण होत असल्याचा आरोप करणे चुकीचे असल्याचे टोपे यांनी म्हटले. 


इतर महत्त्वाच्या बातम्या:


आम्ही करेक्ट कार्यक्रम केला, महाराष्ट्र दोन वर्षांपूर्वी स्वतंत्र झाला: संजय राऊत


महाराष्ट्रात पेट्रोल, डिझेल स्वस्त होणार की नाही? महसूल मंत्री बाळासाहेब थोरात म्हणतात..


 


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha