रत्नागिरी: केरळच्या (Keral) कोळीकोडमध्ये ट्रेनमधील तीन प्रवाशांना जाळल्याचा ( Kozhikode Train Fire Arrest) प्रकार गेल्या रविवारी घडला. यामधील आरोपी शाहरुख सैफीला रत्नागिरी रेल्वे स्टेशनवर अटक करण्यात आली. केरळ एटीएस आणि रत्नागिरी पोलिसांनी ही संयुक्त कारवाई केली.
आरोपी शाहरुख सैफीला मूळचा नोएडा येथील राहणारा आहे. अलप्पुळा-कन्नूर एक्स्प्रेसमध्ये प्रवास करताना आरोपी शाहरुखनं पेट्रोल ओतून डबा पेटवून दिला. यामध्ये तीन जणांचा मृत्यू झाला. ज्यामध्ये एका दोन वर्षांच्या मुलाचाही समावेश आहे. तीन दिवसांपासून केरळ एटीएस आरोपीचा शोध घेत होते. त्याच्या मोबाईल लोकेशनवरून तो रत्नागिरीमध्ये असल्याचं कळलं. केरळ एटीएसनं रत्नागिरी पोलिसांना कळवलं आणि मग शाहरुखला अटक करण्यात आली. केरळ पोलिसांचं पथक आरोपीला ताब्यात घेण्यासाठी रत्नागिरीत दाखल झाली आहे.
तपासात सहकार्य करत नाही
आरोपी शाहरुख तपासात सहकार्य करत नाही किंवा स्थानिक पोलिस, एटीएस किंवा केरळ पोलिसांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देत नाही. आता त्याला केरळ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून, त्याचा ट्रान्झिट रिमांड घ्यायचा की नाही याचा निर्णय ते घेणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केरळ पोलिसांनी 24 तासांत स्थानिक न्यायालयात पोहोचण्याची त्यांची योजना असल्याचे सांगितले आहे
कशी झाली अटक?
आरोपी शाहरुख सैफीला तो गंभीर जखमी झाला आहे. दुसऱ्या ट्रेनमध्ये प्रवास करत असताना खेड येथे ट्रेन मधून उडी मारून तो जखमी झाला. त्यानंतर काही लोकांना तो जखमी अवस्थेत सापडला. त्यानंतर कॉल करून रुग्णवाहिका बोलवण्यात आली. तयाला रत्नागिरी येथील स्थानिक रुग्णालयात नेण्यात आले. तो या प्रकरणातील संशयित असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांना कळताच त्यांनी त्याला अटक करण्याची योजना आखली.
काय आहे प्रकरण?
अलप्पुझा-कन्नूर एक्झिक्युटिव्ह एक्स्प्रेस कोरापुझा रेल्वे पुलावर पोहचलेली असताना 2 एप्रिलला रात्री सुमारे 9.50 वाजता ट्रेनमध्ये चढण्यावरून दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर आरोपी शाहरुख सैफी याने इतर प्रवाशांवर पेट्रोल ओतून त्यांना पेटवून दिले. यामुळे प्रवाशांनी साखळी ओढत ट्रेन थांबवली. ट्रेन थांबताच आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. त्यानंतर प्रवाशांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. या घटनेत एका मुलासह तीन जणांचा मृत्यू झाला. तसेच आठ जण जखमी झाले आहेत.
इतर महत्त्वाच्या बातम्या :