PM Modi Europe Visit : इटली आणि ब्रिटनचा पाच दिवसीय दौरा पूर्ण केल्यानंतर पंतप्रधान मोदी बुधवारी सकाळी दिल्लीला पोहोचले. भारतीय वेळनुसार, पंतप्रधान मोदी मंगळवारी रात्री 11 वाजता ग्लोसगोहून दिल्लीसाठी रवाना झाले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जलवायू शिखर सम्मेलनात जगभरातील अनेक दिग्गजांसह दोन दिवसांच्या चर्चासत्रात सहभाग घेतला होता. ते म्हणाले की, भारतानं पेरिस प्रभावांना पार पाडले आहे, तसेच आता पुढील 50 वर्षांसाठी एक महत्वाकांक्षी एजेंडा देखील निर्धारित केला आहे.
पंतप्रधान मोदींनी रोम आणि ग्लासगोमधील आपला पाच दिवसीय दौरा पूर्ण केल्यानंतर भारतासाठी रवाना झाले होते, त्यावेळी त्यांना एक ट्वीट केलं. त्यांनी एका ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, त्यांनी रोममध्ये जी-20 शिखर सम्मेलनात सहभाग घेतला होता. तर ग्लासगोमध्ये सीओपी-26 जलवायू शिखर सम्मेलनात सहभागी झाले होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक ट्वीट केलं आहे, त्यामध्ये ते म्हणाले की, "आपला ग्रह पृथ्वीच्या भविष्याबाबत दोन दिवसांच्या ग्लासगो येथील चर्चेतून प्रस्थान." पुढे ते म्हणाले की, बऱ्याच काळानंतर अनेक जुन्या मित्रांना समोरासमोर पाहणं आणि काही नव्या लोकांची भेट होणं विलक्षण होतं. मी या कार्यक्रमाचे आयोजन करणारे पंतप्रधान बोरिस जॉनसन आणि मनोरम ग्लासगो यांचा आभारी आहे. तसेच पाहुणचारासाठी स्कॉटलँडच्या नागरिकांचाही आभारी आहे."
स्वेदशी परतताना पंतप्रधान मोदींना भेटण्यासाठी विमानतळावर भारतीयांची गर्दी जमा झाली होती. यादरम्यान भारत परतण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारतीय समुदायाच्या सदस्यांसोबत ड्रम वाजवला.
Corona Vaccine : राज्यात 30 नोव्हेंबरपर्यंत शंभर टक्के लसीकरण करा :मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
कमी लसीकरण झालेल्या जिल्ह्यांचा पंतप्रधान मोदींकडून आज आढावा
जी 20 शिखर परिषद आणि हवामान बदल परिषद 26(COP26) मध्ये सहभागी होऊन देशात परतल्यानंतर लगेचच आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) दुपारी 12 वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून कमी लसीकरण (Covid Vaccine) झालेल्या जिल्ह्यांसोबत आढावा बैठक घेणार आहेत. कोरोना (Coronavirus) प्रतिबंधक लसीचा पहिला डोस 50% पेक्षा कमी दिलेल्या आणि दुसऱ्या डोसची व्याप्ती अत्यंत कमी असलेल्या जिल्ह्यांचा या बैठकीत समावेश असेल. झारखंड, मणिपूर, नागालँड, अरुणाचल प्रदेश, महाराष्ट्र, मेघालय आणि अन्य राज्यातील कमी लसीकरण व्याप्ती असलेल्या 48 जिल्ह्यांतील जिल्हाधिकाऱ्यांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी संवाद साधणार आहेत. यावेळी या राज्यांचे मुख्यमंत्रीही उपस्थित राहणार आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :