Kerala Floods Viral Video : केरळमध्ये (Kerala) मागील दोन दिवसांपासून मुसळधार पावसाने (Kerala Heavy Rains) धुमाकूळ घातला आहे.  दरम्यान, सतत कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूर आणि भूस्खलनामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. केरळमध्ये सध्या जनजीवन विस्कळीत झाले असून नागरिकांची गैरसोय होत आहे. याचदरम्यान, केरळमधील एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल (Viral Video) होत आहे. या व्हिडिओत एक जोडपे चक्क स्वयंपाकाच्या भांड्यात बसून त्यांच्या विवाहस्थळी जाताना दिसत आहे. या व्हिडीओला अनेकांना पसंती दर्शवली आहे.


Kerala Floods : केरळात पावसाचा रुद्रावतार; अनेक भागांत भूस्खलन 


दरम्यान, केरळमध्ये सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे प्रचंड लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावा लागत आहे. याचदरम्यान, या अडचणींना बाजूला ठेवून केरळमधील एका जोडप्याने त्यांच्या विवाह सोहळा पार पाडला आहे. परंतु, मुसळधार पावसामुळे केरळच्या अलप्पुझा येथे पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. तसेच अनेक भागात पाणी साचले आहे. ज्यामुळे या भागातील वाहतूक विस्कळीत झाली आहे. मात्र, असे असतानाही हे जोडपे चक्क स्वयंपाकाच्या भांड्यात बसून त्यांच्या विवाहस्थळी जाताना दिसत आहेत.



व्हायरल व्हिडिओतील जोडपे व्यवसायाने आरोग्य कर्मचारी असून हे दोघेही चेंगन्नूर येथील रुग्णालयात कार्यरत आहेत. त्यांचा विवाह थलावडी येथील एका मंदिरात पार पडणार होते. परंतु, मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी आलेल्या पूरामुळे या जोडप्यांना त्यांच्या विवाहाची तारीख पुढे ढकलण्यास सांगितले. कोरोना काळात ड्युडी करणाऱ्या या जोडप्याला पुढील रजा कधी मिळणार? याची शंका असल्याने अशा परिस्थितीतही त्यांनी विवाह करण्याचा निर्णय घेतला.