केरळ : केरळच्या कोझीकोडमध्ये एअर इंडियाचं एक विमान कोसळलं आहे. या दुर्घटनेत विमानाच्या दोन पायलटसह 19 जणांचा मृत्यू झाला आहे. 121 प्रवासी जखमी झाले आहेत तर 15 प्रवासी गंभीर जखमी आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, दुबईहून कालीकत येथे येणारं एअर इंडियांचं विमान दुर्घटनाग्रस्त झालं होतं. रनवेहून पुढे हे विमान निघून गेलं, त्यामुळे ही दुर्घटना झाली आहे. एअर इंडियाचं विमान IX-1344 हे विमान दुर्घटनाग्रस्त झालं होतं. घटना घडल्यानंतर विमान दरीत कोसळलं आणि विमानाचे दोन तुकडे झाले.


अपघातानांतर फायर टेंडर आणि अॅम्बुलन्स घटनास्थळी दाखल झाल्या असून बचावकार्य सुरु होतं. विमानाच्या पुढील भागाचं मोठं नुकसान झालं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संध्याकाळी 7.45 च्या सुमारास ही घटना घडली. एअर इंडिया एक्स्प्रेसच्या माहितीनुसार, कोझिकोडमधील करीपूर विमानतळावर एअर इंडिया एक्सप्रेसचे विमान लँडिंगच्या वेळी धावपट्टीवर घसरले. विमानात दोन पायलटसह सहा क्रू मेंबर्स होते. तर विमानात 191 प्रवाशी प्रवास करत होते, ज्यामध्ये 10 मुलांचा समावेश आहे.


पाहा व्हिडीओ : कोझिकोडमधील दुर्दैवी विमान अपघाताबाबत NDRFचे महासंचालक एस एन प्रधान यांची माहिती



कोझीकोड विमानतळावर हा अपघात कोणत्या कारणामुळे झाला, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. परंतु, या अपघातामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. या विमानतळाचा रनवे 'टेबलटॉप रनवे' असल्यामुळे अपघात झाल्याचा अंदाज अनेकजण व्यक्त करत आहेत. पण हा टेबलटॉप रनवे म्हणजे नेमकं काय?


केरळमध्ये एअर इंडियांचं विमान लँडिंगदरम्यान दुर्घटनाग्रस्त, 16 जणांचा मृत्यू


'टेबलटॉप रनवे' म्हणजे नेमकं काय?


'टेबलटॉप रनवे' या शब्दातच याचा अर्थ दडलेला आहे. म्हणजेच, एखाद्या पठारावर हा रनवे असतो आणि हा रनवे जिथे सुरु होतो आणि जिथे संपतो अशा दोन्ही टोकांना दरीसारखा खोलगट भाग किंवा उतार असतो. खरंतर बाहेरील देशांत बहुतांश ठिकाणी समांतर रनवे असतात.त्यामुळे विमान लँड करतना किंवा टेक ऑफ करताना फारशा समस्या उद्भवत नाहीत. भारतात मात्र
समांतर रनवे सरसकट आढळत नाहीत.


भारतात कोझीकोडप्रमाणेच मँगलोर आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि मिझोरममध्ये असलेलं लेंगपुई विमानतळ येथील रनवेसुद्धा 'टेबलटॉप रनवे' आहेत. डोंगराळ भागातून किंवा टेकडीच्या माथ्यावर हे रनवे असल्यामुळे अनेकदा वैमानिकांचा रनवे पठारावर नसून टेकडीखालच्या भागात जमिनीवगत असल्याचा भास होतो. यामुळेच अपघात घडतात.


महत्त्वाच्या बातम्या : 


Kerala Plane Crash | कॅप्टन दिपक साठेंनी गमावला जीव, महाराष्ट्राच्या सुपुत्राने जीवाची बाजी लावत वाचवले अनेक प्राण