चेन्नई : डीएमकेचे अध्यक्ष करुणानिधी यांनी तामिळनाडूमधील तिरुवरुर विधानसभा मतदारसंघातून सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांनी प्रतिज्ञापत्रात 13.42 कोटी रुपयांची मालमत्ता असल्याचा उल्लेख केला आहे.
करुणानिधींनी प्रतिज्ञापत्रात जाहीर केलेली संपत्ती जंगम मालमत्ता आहे. कारण त्यांनी प्रतिज्ञापत्रात जमीन किंवा अन्य स्थावर मालमत्तेचा उल्लेख केला नाही. करुणानिधींच्या पत्नीकडे 45 कोटी 34 लाखांची जंगम मालमत्ता आहे.
तिरुवरुनमधून करुणानिधी दुसऱ्यांदा विधानसभेच्या रणांगणात उतरले आहेत. करुणानिधींकडे 12.72 कोटी रुपये बँकेत जमा असून, अंजूगाम प्रिंटर्समध्ये 10.22 लाख किंमतीचे शेअर्स आहेत.