नवी दिल्ली : भारतात प्लस कँडीचा व्यवसाय मोठ्याने वाढताना दिसतो आहे. मँगो बाईट, पल्स कँडी आणि अल्फेनलिबीसारख्या कँडींना भारतात मोठी मागणी आहे. धर्मपाल सत्यपाल (डीएस) ग्रुपच्या ‘पल्स कँडी’ने अवघ्या 8 महिन्यात 100 कोटींची कमाई केली आहे.


 

कोका कोला कंपनीच्या कोक झिरोच्या बरोबरीचा हा रेकॉर्ड असल्याचा पल्स सत्यपाल ग्रुपचा दावा आहे.

 

डीएस ग्रुपमध्ये न्यू प्रॉडक्ट डेव्हिलपमेंटचे व्हीपी शशांक सुराना यांनी सांगितले, “आम्ही पल्स कँडी एक रुपयात लॉन्च केली आहे. विशेष म्हणजे दुसऱ्या कंपन्याही आमच्या मार्गाने चालू लागल्या आहेत. याआधी सर्व कंपन्या 4 ग्रॅमच्या हार्ड बॉयल्ड कँडी 50 पैशांना विकत असत.”

 

नोएडास्थित डीएस ग्रुपने पल्स कँडी केवळ राजस्थान, दिल्ली आण गुजरातमध्येच लॉन्च केली होती. या राज्यांमध्ये या कँडीने कमाईचे रेकॉर्ड्स तोडले आहेत. विशेष म्हणजे कंपनीने कँडीच्या प्रसार-प्रचारासाठी कोणत्याही जाहिरातीचा आधार घेतला नाही. डीएस ग्रुप रजनीगंधा पान-मसाला, पास-पास आणि कॅच मसाला हे प्रॉडक्ट्सही तयार करतं.