बंगळुरु: बंगळुरुतील तलाव फेसाळल्यामुळे शहरातील रस्त्यांवर बर्फवृष्टी झाल्यासारखं चित्र पाहयला मिळतंय. मात्र ही बर्फवृष्टी नसून दूषित रसायनांमुळे तयार झालेला फेस आहे.

हा फेस सध्या बंगळुरुतील रस्त्यांवर पसरला आहे. मुसळधार पावसानंतर बंगळुरुतील रस्त्यांवर दूषित रासायनिक फेसाचं साम्राज्य पाहायला मिळतंय.

हा फेस इतक्या मोठ्या प्रमाणात होता की रस्त्यावर पांढरे ढग उतरल्यासारखं वाटत होते.

हा फेस वाहनचालकांनाही अडथळे निर्माण करत आहे. दुचाकी, चारचाकी गाड्यांवरही हा फेस दिसत आहे. त्यामुळे रस्त्यावर वाहतुकीची समस्या निर्माण होत आहे.

दुसरीकडे यावर कोणताही उपया सध्यातरी नसल्याचं सांगण्यात येत आहे.

https://twitter.com/ANI_news/status/869054554867769345